नागपूर पोलिस आता ‘गुरुजीं’च्या भूमिकेत

| Updated on: Jul 05, 2019 | 4:41 PM

नागपूर : नागपूर पोलीस आता छात्र पोलिसिंग अभियान सुरु करणार आहेत. या अभियानाच्या माध्यमातून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पोलिस राष्ट्रप्रेमाचे धडे देणार आहेत. विद्यार्थी देशाचं भविष्य आहेत, याच विद्यार्थ्यांना एक जबाबदार नागरिक बनवण्यासाठी नागपूर पोलिसांनी छात्र पोलिस अभियान सुरु केलं आहे. पाच झोन, 30 पोलिस स्टेशन आणि 8000 पोलिसांचा ताफा, अशी नागपूर पोलिसांची ताकद आहे. आता यात […]

नागपूर पोलिस आता गुरुजींच्या भूमिकेत
Follow us on

नागपूर : नागपूर पोलीस आता छात्र पोलिसिंग अभियान सुरु करणार आहेत. या अभियानाच्या माध्यमातून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पोलिस राष्ट्रप्रेमाचे धडे देणार आहेत. विद्यार्थी देशाचं भविष्य आहेत, याच विद्यार्थ्यांना एक जबाबदार नागरिक बनवण्यासाठी नागपूर पोलिसांनी छात्र पोलिस अभियान सुरु केलं आहे.

पाच झोन, 30 पोलिस स्टेशन आणि 8000 पोलिसांचा ताफा, अशी नागपूर पोलिसांची ताकद आहे. आता यात नवीन अध्याय सुरु झालाय तो छात्र पोलिसिंगचा. नागपूर पोलिस आयुक्त डॉ. भुषण कुमार उपाध्याय यांच्या पुढाकाराने शहरात छात्र पोलिसिंग अभियान सुरु झालंय. यात प्रत्येक पोलिस स्टेशन हद्दीतील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीयतेचे धडे देतात.

गुन्हे, वाहतूक नियम, ड्रग आणि राष्ट्रीयता याबाबत पोलीस विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहे. याच निमित्तानं पोलिस आणि विद्यार्थ्यांमध्ये संवाद वाढेल आणि गुन्हेगारीकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांचं मनपरिवर्तन करण्यास मदत होईल. हाच पोलिसांचा हेतू आहे.

दरम्यान, पोलिसांबद्दल अनेकांच्या मनात भीती असते, त्यामुळे नागपूर पोलिसांच्या या अभियानामुळे नक्कीच नागरिकांमध्ये सुद्धा सुरक्षेची भावना निर्माण होण्यासही मदत होईल.