नाशकात खाजगी रुग्णालयांचे नियंत्रण जिल्हाधिकारी आणि आयुक्तांकडे, भुजबळांचे आदेश

| Updated on: Jun 30, 2020 | 6:46 PM

नाशिकमधील खाजगी रुग्णालयाचे नियंत्रण जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांकडे देण्यात येणार (Nashik Private Hospital Control Collector) आहे.

नाशकात खाजगी रुग्णालयांचे नियंत्रण जिल्हाधिकारी आणि आयुक्तांकडे, भुजबळांचे आदेश
Follow us on

नाशिक : राज्यातील अनेक खासगी रुग्णालयात कोरोना रुग्णांकडून जास्त प्रमाणात (Nashik Private Hospital Control Collector And Municipal Commissioner) पैसे उकळले जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. याच पार्श्वभूमीवर नाशिक शहरात खाजगी रुग्णालयात नियंत्रण थेट जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांकडे देण्यात येणार आहे, असे आदेश पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून खाजगी रुग्णालयांची मुजोरी वाढत चालली आहे. ते रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता शहरात पुन्हा एकदा संध्याकाळी 7 ते पहाटे 5 पर्यंत कर्फ्यू लावण्यात आला आहे

पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीमध्ये अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यात शहरातल्या खासगी रुग्णालयांकडून रुग्णांची सुरू असलेली लूट थांबवण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. या रुग्णालयांमध्ये कोणाला दाखल करायचे, कुठे दाखल करायचे, याबाबतचे सर्व अधिकार जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त यांच्याकडे देण्यात येणार असल्याचं भुजबळ यांनी स्पष्ट केले.

दरम्यान कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता शहरात पुन्हा एकदा संध्याकाळी सात ते पहाटे पाच यावेळेत कर्फ्यू लावण्यात आला आहे. यावेळेत नागरिकांनी बाहेर पडू नये अन्यथा कारवाई करु असे आदेश देण्यात आले आहेत.

दरम्यान शहरात वाढणारी रुग्ण संख्या लक्षात घेता ठक्कर डोम पाठोपाठ इतरही मोकळ्या जागांचा विचार सुरू असल्याचं भुजबळ यांनी सांगितले. याव्यतिरिक्त शहरातल्या गजबजलेल्या जागांवर नो व्हेहिकल झोन उभारण्याच्या सूचना पोलीस आयुक्तांना देण्यात आल्या आहेत. (Nashik Private Hospital Control Collector And Municipal Commissioner)

संबंधित बातम्या : 

Pandharpur Corona | आषाढी एकादशीच्या तोंडावर पंढरपुरात सात नवे रुग्ण, प्रशासनाची चिंता वाढली

पगारवाढीच्या मागणीसाठी नर्सेस भर पावसात रस्त्यावर, लेखी आश्वासनाच्या मागणीसह केडीएमसी मुख्यालयासमोर ठिय्या