Phone Pe आणि PayTm च्या मदतीने फसवणूक, चोरलेले 6 लाख 46 हजार रुपये पोलिसांनी परत मिळवले

अज्ञात इसमांनी Phone Pe आणि PayTm चे KYC अपडेट करणाच्या बहाण्याने 6 लाख 46 हजार रुपये लंपास केले आहेत.

Phone Pe आणि PayTm च्या मदतीने फसवणूक, चोरलेले 6 लाख 46 हजार रुपये पोलिसांनी परत मिळवले
| Updated on: Oct 13, 2020 | 7:35 PM

नवी मुंबई : सध्या ऑनलाईन फसवणूक करुन पैसे लुटणाऱ्या टोळ्या मोठ्या (Navi Mumbai Online Fraud) प्रमाणावर सक्रिय झाल्या आहेत. असाच एक प्रकार नवी मुंबईत उघडकीस आला आहे. अज्ञात इसमांनी Phone Pe आणि PayTm चे KYC अपडेट करणाच्या बहाण्याने 6 लाख 46 हजार रुपये लंपास केले आहेत (Navi Mumbai Online Fraud).

नवी मुंबईमध्ये राहणार महेश पवार आणि वरुणराज प्रभाकर यांना अज्ञानाने कॉल करुन फोन पे आणि पेटीएम वॉलेटतर्फे बोलत असल्याचं सांगितलं. त्यांनी फोन पे, पेटीएमचे KYC अपडेट करण्याबाबत सांगितलं. त्यानंतर महेश पवार आणि वरुणराज प्रभाकर यांच्या मोबाईल नंबरवर QS Support Application लिंक पाठवली. त्या लिंकवर क्लिक करायला लावलं. त्यानंतर बारकोड स्कॅन करुन महेश पवार यांच्या खात्यातील 1 लाख 47 हजार, वरुणराज प्रभाकर यांच्या खात्यातील 4 लाख 99 हजार रुपयांची रक्कम लंपास केली.

फसवणूक झाल्याचं लक्षात येताच महेश पवार यांनी वाशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तर, वरुणराज प्रभाकर यांनी रबाळे पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. या प्रकरणाची तात्काळ पीएसआय काशिनाथ माने आणि पीएसआय निलेश पोळ यांनी दखल घेतली. त्यांनी Paytm चे दिल्ली येथील अधिकाऱ्यांशी आणि बँकेच्या नोडल अधिकाऱ्यांशी ई-मेलद्वारे तात्काळ संपर्क साधून तक्रारदार यांचे बँक अकाउंटमधून चोरलेले 6 लाख 46 हजार रुपये परत खात्यात रिफंड मिळवून दिले.

या प्रकरणी तात्काळ न्याय मिळवून दिल्याबाबत महेश पवार आणि वरुणराज प्रभाकर यांनी डीसीपी सुरेश मेंगाडे एसीपी विनायक वस्ट यांचे आभार मानले.

Navi Mumbai Online Fraud

संबंधित बातम्या :

बुलडाण्यात नग्न चोरट्याने पोलीस स्टेशनसमोरील 7 दुकानं फोडली, हजारोंचा ऐवज लंपास

चोराचं धाडस बघा ! चक्क कोरोना रुग्णालयात जाऊन करायचा चोरी; पोलीसही अवाक