AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बुलडाण्यात नग्न चोरट्याने पोलीस स्टेशनसमोरील 7 दुकानं फोडली, हजारोंचा ऐवज लंपास

बुलडण्यातील धाड पोलीस स्टेशनपासून अवघ्या 30 फूट अंतरावर असलेली 7 दुकानं फोडून नग्न चोराने हजारोंचा ऐवज लंपास केला आहे.

बुलडाण्यात नग्न चोरट्याने पोलीस स्टेशनसमोरील 7 दुकानं फोडली, हजारोंचा ऐवज लंपास
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Updated on: Oct 12, 2020 | 4:44 PM
Share

बुलडाणा : बुलडाण्यातील धाड पोलीस स्टेशनपासून अवघ्या 30 फूट अंतरावर असलेली 7 दुकानं फोडून (Naked Thief Broke 7 Shops) नग्न चोराने हजारोंचा ऐवज लंपास केला आहे. ही घटना रविवारी रात्री 1 वाजताच्या सुमारास घडली. मात्र चोरी करताना हा नग्न चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला.

धाडमधील चिरानिया ट्रेडर्स कंपनीच्या छताचे लोखंडी टिनपत्र वाकवून चोरट्याने दुकानात प्रवेश केला. त्यानंतर दुकानाच्या गल्ल्यातून हजारो रुपयांची रोकड लंपास केली. तर लक्ष्मी बिकानेर स्वीटमार्ट फोडून 10 ते 15 हजार रुपयांचं सामान, रॉयल इलेक्ट्रिकल फोडून पॉलिकेप वायरचे 12-13 बंडल, सोनल अॅग्रो ट्रेडर्स, वर्षा इलेक्ट्रिक, रॉयल इलेक्ट्रिकल आणि शेतकरी ट्रेडर्सही फोडले.

मात्र, इतकी दुकान फोडूनही चोरट्याला हजार-दीड हजाराच्या रोकडवरच समाधान मानावे लागले. एकाच रात्री 7 दुकाने फोडल्याने व्यापाऱ्यांमध्ये कमालीची दहशत पसरली आहे. पोलिसांनी लवकरात लवकर चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

Naked Thief Broke 7 Shops

संबंधित बातम्या :

पुण्यात वाळू सप्लायरवर गोळीबार, गोळी गालाला लागून गेल्याने थोडक्यात बचावला

चोराचं धाडस बघा ! चक्क कोरोना रुग्णालयात जाऊन करायचा चोरी; पोलीसही अवाक

Follow Us
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ