‘संपूर्ण देशाला तुमच्यावर गर्व’, सशस्त्र सेना झंडा दिनी पंतप्रधान मोदींकडून जवानांना सलाम

| Updated on: Dec 07, 2020 | 1:49 PM

सशस्त्र सेना झंडा दिवस म्हणजे आपले जवान आणि त्यांच्या परिवाराप्रती आभार व्यक्त करण्याचा दिवस आहे. संपूर्ण भारतवासीयांना त्यांचं शौर्य, निस्वार्थ भावनेनं केलेली देशाची सेवा आणि त्यांच्या बलिदानावर गर्व आहे. आपल्या सैन्याच्या कल्याणासाठी सर्वांनी योगदान द्यावं, असं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलं आहे.

संपूर्ण देशाला तुमच्यावर गर्व, सशस्त्र सेना झंडा दिनी पंतप्रधान मोदींकडून जवानांना सलाम
Follow us on

नवी दिल्ली: शत्रू राष्ट्रांपासून देशाच्या सीमा आणि सर्व भारतीयांना सुरक्षित ठेवण्यासाठी अहोरात्र झटकणाऱ्या जवानांना सन्मानित करण्यासाठी प्रत्येक वर्षी सशस्त्र सेना झंडा दिवस साजरा केला जातो. यावर्षीही हा दिवस मोठ्या दिमाखात साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय सैन्याच्या तिन्ही दलातील जवानांना सलाम केला आहे. (PM Narendra Modi, Defense Minister Rajnath Singh salutes the Indian soldiers)

सशस्त्र सेना झंडा दिवस म्हणजे आपले जवान आणि त्यांच्या परिवाराप्रती आभार व्यक्त करण्याचा दिवस आहे. संपूर्ण भारतवासीयांना त्यांचं शौर्य, निस्वार्थ भावनेनं केलेली देशाची सेवा आणि त्यांच्या बलिदानावर गर्व आहे. आपल्या सैन्याच्या कल्याणासाठी सर्वांनी योगदान द्यावं, असं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलं आहे. आपलं हे योगदान अनेक शूर जवान आणि त्यांच्या परिवाराला मदत करेल, असंही मोदी म्हणाले.

संरक्षणमंत्र्यांकडूनही नमन

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही सशस्त्र सेना झंडा दिवसानिमित्त भारतीय सैन्याचं शौर्य आणि त्यांच्या निस्वार्थ भावनेला सलाम केला. ‘हा दिवस आपल्याला माजी सैनिक, युद्धात जखमी झालेले सैनिक आणि त्यांच्या परिवाराच्या कल्याणासाठी आपल्या महान कार्याची आठवण करुन देतो. ज्यांनी देशाचं रक्षण करण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली’, असं ट्वीट राजनाथ सिंह यांनी केलं आहे.

सशस्त्र सेना झंडा दिनाचा इतिहास

प्रत्येक वर्षी 7 डिसेबंरला सशस्त्र सेना झंडा दिन साजरा केला जातो. हा दिन साजरा करण्याची सुरुवात 1949 मध्ये झाली. 28 ऑगस्ट 1949 ला तत्कालीन संरक्षणमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली होती. त्या समितीने दर वर्षी 7 डिसेंबरला साजरा करण्याचा निर्णय घेतला.

हा दिवस साजरा करण्यासाठी सुरुवातीला नागरिकांना छोटे झेंडे वितरित केले जावे आणि त्याबदल्यात सैनिकांसाठी डोनेशन गोळा करावं, असा विचार होता. सर्वसामान्य नागरिकांनी देशाचं रक्षण करण्यासाठी सीमेवर तैनात असलेल्या जवानांच्या परिवाराची काळजी घ्यावी, हा महत्वपूर्ण उद्देश हा दिवस साजरा करण्यामागे आहे.

संबंधित बातम्या:

नव्या कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांच्या समस्या दूर होतील; पंतप्रधान नरेंद्र मोदींना विश्वास

गलवान खोऱ्यात 20 भारतीय जवानांचा जीव घेणारी हिंसक झटापट चीनच्या ‘षडयंत्रा’चा भाग, US काँग्रेस पॅनलचा दावा

PM Narendra Modi, Defense Minister Rajnath Singh salutes the Indian soldiers