WTC Final मध्ये दुसऱ्या डावांत फलंदाजी करण्याआधीच रॉस टेलरने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा न्यूझीलंडचा पहिला तर जगातील तिसरा फलंदाज

| Updated on: Jun 23, 2021 | 5:13 PM

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात (WTC Final 2021) पहिल्या डावांतील 11 धावांच्या जोरावर न्यूझीलंडच्या रॉस टेलरने एक दमदार विक्रम आपल्या नावे केला आहे. त्याने आंतराराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 18 हजार धावा करणारा पहिला न्यूझीलंडवासी ठरला आहे.

WTC Final मध्ये दुसऱ्या डावांत फलंदाजी करण्याआधीच रॉस टेलरने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा न्यूझीलंडचा पहिला तर जगातील तिसरा फलंदाज
ross Taylor
Follow us on

साऊदम्पटन : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात (WTC Final 2021) न्यूझीलंडचा सर्वांत अनुभवी फलंदाज रॉस टेलरने एक दमदार विक्रम आपल्या नावे केला आहे. सामन्यात न्यूझीलंडच्या पहिल्या डावातील फलंदाजी दरम्यान केवळ 11 धावा करतच टेलरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 18 हजार धावांचा डोंगर सर केला आहे. WTC Final सामन्याआधी टेलरच्या नावावर 17 हजार 796 धावा होत्या. त्यानंतर भारताविरुद्ध पहिल्या डावात 11 धावा करत टेलरने 18 हजार 7 धावा नावे केल्या आहेत. (New Zealand Player Ross Taylor became Most International Run Scorer for New Zealand with 18000 plus runs)

रॉस टेलरने तिन्ही फॉर्मेटमध्ये न्यूझीलंडकडून उत्तम क्रिकेट खेळत ही कामगिरी केली आहे. एकूण 18 हजार 7 धावांपैकी टेलरच्या नावावर कसोटी सामन्यांत 7 हजार 517 रन्स आहेत. तर एकदिवसीय सामन्यात 8 हजार 581 रन्स आहेत. त्यासोबतच टी-20 सामन्यांतही टेलरने 1 हजार 909 रन्स केले आहेत. टेलरनंतर न्यूझीलंडकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा माजी कर्णधार फ्लेमिंगच्या नावावर असून फ्लेमिंगने  15 हजार 289 रन्स केले आहेत.

सक्रिय खेळाडूंमध्ये तिसऱ्या नंबरवर

टेलरने 18 हजार धावांचा टप्पा पार करत सध्या सक्रिय फलंदाजामध्ये तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. टेलर आधी सर्वांत वर नंबर लागतो भारतीय कर्णधार विराट कोहलीचा. विराटच्या नावावर 22 हजार 862 आंतरराष्ट्रीय धावा आहे. विराटने टेस्टमध्ये 7 हजार 490, वनडेमध्ये 12 हजार 169 आणि टी-20 मध्ये 3 हजार 159 रन केले आहेत. विराटनंतर नंबर लागतो वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा. गेलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 19 हजार 359 धावा केल्या आहेत. यामध्ये टेस्ट क्रिकेटचे 7 हजार 214, वनडेचे 10 हजार 480 आणि टी-20 चे 1 हजार 656 धावांचा समावेश होतो.

हे ही वाचा :

WTC Final मधील अष्टपैलू कामगिरीचं रवींद्र जाडेजाला रिटर्न गिफ्ट, ICC क्रमवारीत मुसंडी, जेसन होल्डरला टाकलं मागे

WTC Final 2021 : बोलिंगसह बॅटचीही जादू, टीम साऊथीने सचिन तेंडुलकरपासून पॉन्टिगपर्यंत अनेकांना पछाडलं!

WTC Final : टॉवेल बांधून मैदानात उतरला मोहम्मद शमी, फोटो पाहून चाहते लोटपोट, म्हणाले सावरिया 2.0

(New Zealand Player Ross Taylor became Most International Run Scorer for New Zealand with 18000 plus runs)