मराठा समाजाला ‘ओबीसी’त आरक्षण दिल्यास मतदानावर बहिष्कार, ओबीसी समाजाचा इशारा

| Updated on: Sep 24, 2020 | 5:42 PM

ओबीसी आरक्षण बचावासाठी ओबीसी बांधव आंदोलन करतील," असा इशारा देण्यात आला. (OBC Community Warns Government on Maratha Reservation) 

मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण दिल्यास मतदानावर बहिष्कार, ओबीसी समाजाचा इशारा
Follow us on

पुणे : “मराठा समाजाला शिक्षणात, नोकऱ्यात आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही. मात्र ते आरक्षण ओबीसी आरक्षण कोट्यातून दिल्यास रस्त्यावर उतरु”, असा इशारा ओबीसी समाजाच्या प्रतिनिधींनी दिला. जर लोकप्रतिनिधी आणि पक्षांनी मूक भूमिका घेतली तर मतदानावर बहिष्कार घालू, अशी भूमिका ओबीसी संघर्ष सेनेनं मांडली आहे. (OBC Community Warns Government on Maratha Reservation)

पुणे श्रमिक पत्रकार संघात झालेल्या या पत्रकार परिषदेला ओबीसी संघर्ष सेनेचे अध्यक्ष प्रा.लक्ष्मण हाके, बारा बलुतेदार महासंघाचे विशाल जाधव, ओबीसी संघर्ष सेनेचे रामदास सूर्यवंशी, महाराष्ट्र राज्य गुरव संघटना प्रताप गुरव, माळी महासंघ अनंता कुदळे, ओबीसी संघर्ष सेनेचे नेते सुरेश गायकवाड उपस्थित होते.

“ओबीसी आरक्षणात मराठा समाजाला आरक्षण दिल्यास 52 टक्के ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल. ओबीसी आरक्षण बचावासाठी ओबीसी बांधव आंदोलन करतील,” असा इशारा देण्यात आला.

“मराठा समाजाच्या अनेक संघटनांतर्फे समाजाला सरसकट ओबीसीमध्ये समाविष्ट करुन ओबीसींच्या आरक्षणात 5 टक्के आरक्षणाची मागणी होत आहे. त्यांची ही मागणी घटनाबाह्य आहे. तसेच ओबीसींवर अन्याय करणारी आहे. त्याबद्दलचे सविस्तर निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि प्रशासनाकडे पाठवत आहोत,” असे प्रा. हाके यांनी सांगितले. (OBC Community Warns Government on Maratha Reservation)

संबंधित बातम्या : 

आता ओबीसींनाही हवाय ज्यादा निधी, वडेट्टीवारांच्या नेतृत्वात ओबीसी नेते मुख्यमंत्र्यांना भेटणार

Maratha Reservation | मराठा आरक्षणासाठी 10 ऑक्‍टोबरला महाराष्ट्र बंद, मराठा नेते आक्रमक