पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा बदला पूर्ण, गाडी पुरवणारा दहशतवादीही ठार

जम्मू आणि काश्मीरमध्ये सोमवारी दहशतवाद्यांच्या चकमकीत एक जवान शहीद झाला आहे. याशिवाय तीन जवानही गंभीर जखमी आहेत.

पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा बदला पूर्ण, गाडी पुरवणारा दहशतवादीही ठार

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये सुरक्षा दलांना एक मोठे यश मिळाले आहे. सुरक्षा दलांनी गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत पुलवामा हल्ल्यात गाडी पुरवणाऱ्या दहशतवाद्याला ठार केले आहे. वाघोमा येथील या चकमकीत आतापर्यंत 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे.

तौसीफ अहमद भट आणि हाफिज सजाद भट असे कंठस्नान घालण्यात आलेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत. ते जैश-ए-मोहम्‍मद या दहशतवादी संघटनेचे सदस्य होते. पुलवामा येथे सैन्याच्या वाहन ताफ्यावर हल्ला करण्यासाठी वापरलेली गाडी सजाद भटच्या गाडीचा उपयोग झाला होता. सजाद उर्फ अफजल गुरु पुलवामा हल्ल्याच्या 15 दिवस आधीच जैश-ए-मोहम्‍मदचा आत्मघातकी दहशतवादी झाला होता.

सुरक्षा दलांनी गुप्तमाहितीच्या आधारे अनंतनागच्या बिदूरा गावात ‘सर्च ऑपरेशन’ सुरु केले. यावेळी दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. या हल्ल्याला जवानांनीही सडेतोड उत्तर देत 2 दहशतवाद्यांना ठार केले. दहशतवाद्यांशी झालेल्या या चकमकीत सुरक्षा दलाचे 3 जवानही गंभीर जखमी झाले आहेत. जखमी जवानांना श्रीनगरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, गंभीर जखमी झालेल्या एका जवानाचा उपचाराआधीच मृत्यू झाला.

राष्ट्रीय रायफल्स (आरआर) आणि राज्य पोलीस कर्मचाऱ्यांनी विशेष अभियान समूहाने (एसओजी) दहशतवादी लपून बसलेल्या गावाला घेराव घातला आहे. संबंधित दहशतवादी जैश-ए-मोहम्मद संघटनेचे असल्याचे असल्याची माहिती मिळत आहे. सध्या अनंतनाग येथे सर्च ऑपरेशन सुरु आहे.

दरम्यान, जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामामध्ये पुन्हा एकदा जवानांच्या गाडीवर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. यावेळीही दहशतवाद्यांनी IED ब्लास्ट केला आहे. या हल्ल्यात एकूण 9 जवान जखमी झाले आहेत.

Published On - 8:22 am, Tue, 18 June 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI