‘उद्याची पिढी घडवण्याची जबाबदारी आमचीच’, रोहित पवारांकडून कर्जत-जामखेडमध्ये ऑनलाईन शिक्षणाचा अनोखा प्रयोग

| Updated on: Aug 22, 2020 | 6:01 PM

रोहित पवार यांच्या पुढाकारातून कर्जत-जामखेड मतदारसंघातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन तंत्रज्ञान विकसित करण्यात आलंय (Rohit Pawar Online Education initiative).

उद्याची पिढी घडवण्याची जबाबदारी आमचीच, रोहित पवारांकडून कर्जत-जामखेडमध्ये ऑनलाईन शिक्षणाचा अनोखा प्रयोग
Follow us on

अहमदनगर : सध्या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सर्व शाळा आणि महाविद्यालय बंद आहे. त्यामुळे सर्वत्र ऑनलाईन शिक्षण पद्धत वापरली जाऊ लागलीये. हीच परिस्थिती लक्षात घेऊन आमदार रोहित पवारांनी एक पाऊल पुढे टाकले आहे. त्यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन तंत्रज्ञान विकसित करण्यात आलंय (Rohit Pawar Online Education initiative). सध्या याचीच चर्चा या मतदारसंघात सुरु आहे.

राज्यात सध्या कोरोनाचं मोठं संकट उभे राहिली आहे. त्यामुळे सर्व शाळा आणि महाविद्यालयं बंद ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे ऑनलाईन शाळेचा पर्याय समोर आला. मात्र यात अनेक अडचणी समोर येत आहेत. या सर्व अडचणी लक्षात घेऊन कर्जत-जामखेड तालुक्याचे आमदार रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नविन तंत्रज्ञान विकसित करण्यात आलंय. कोरोनामुळे राज्यात जूनमध्ये सुरु होणाऱ्या शाळा अजूनही सुरू झालेल्या नाहीत. राज्य सरकारने ऑनलाइन शाळा सुरु करण्यास सांगितलं. मात्र शिक्षकांना व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून अभ्यास देण्यापलीकडे ऑनलाईन शाळेचा कोणताही प्रयोग यशस्वी करता आलेला नाही.


“ऑनलाईन शाळा सुरु करण्यासाठी शिक्षकांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे. गेल्या दोन अडीच महिन्यांपासून आम्ही या अॅपवर काम करतो आहे. यात 1400 शिक्षकांचं ट्रेंनिग पूर्ण केले आहे. सध्या 12 हजार 500 विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन आहे. तर 6 हजार मूल मुली रोज ऑनलाईन शिक्षण घेत आहेत. हा आकडा आम्ही वाढवणार असून उद्याची पिढी घडवण्याची जबाबदारी आमचीच आहे”, असं मत रोहित पवारांनी व्यक्त केलंय.

अॅपच्या माध्यमातून ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी सक्षम यंत्रणा उभी राहिली आहे. या अॅपच्या माध्यमातून आपल्याच शिक्षकाने दिलेला अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना मिळत आहे. शिवाय मोबाईलवर अभ्यास करणं सोपं आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षक समाधानी आहेत. महत्वाचे म्हणजे मुले अगदी आवडीने शिक्षण घेत आहेत. या
अॅपमुळे विद्यार्थी अभ्यास करतात का नाही हेही लक्षात येतं. अगदी सहज आणि सोप्या भाषेत याची निर्मिती करण्यात आली आहे.

सध्या नगर जिल्ह्यात या अॅपची जोरदार चर्चा सुरु आहे. कर्जत-जामखेडच्या विद्यार्थ्यांची शाळा बंद असली, तरी अभ्यास मात्र जोरदार सुरु आहे. त्यामुळे राज्यात देखील असाच प्रयोग राबण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा :

सुशांत प्रकरणावरुन राजकारण, इतर महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणं गरजेचं, रोहित पवारांचा विरोधकांवर घणाघात

काम घोळत न ठेवता थेट निर्णय ही दादांची स्टाईल, अजित पवारांच्या भेटीनंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया

Rohit Pawar Online Education initiative