पुणे-सोलापुरातून चोरलेल्या 44 बाईक्स जप्त, उस्मानाबादमध्ये टोळीचा पर्दाफाश

| Updated on: Mar 05, 2020 | 8:58 AM

उस्मानाबाद पोलिसांनी धडक कारवाई करत दुचाकी चोरी करण्याऱ्या टोळीचा पर्दाफाश केला (Police arrested bike thief) आहे.

पुणे-सोलापुरातून चोरलेल्या 44 बाईक्स जप्त, उस्मानाबादमध्ये टोळीचा पर्दाफाश
Follow us on

उस्मानाबाद : उस्मानाबाद पोलिसांनी धडक कारवाई करत दुचाकी चोरी करण्याऱ्या टोळीचा पर्दाफाश केला (Police arrested bike thief) आहे. पोलिसांनी या कारवाईत दोन आरोपींना अटक केली असून 44 दुचाकी जप्त केल्या आहेत. उस्मानाबाद स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या या कारवाईत पुणे, सोलापूर जिल्ह्यातील बहुतांश मोटार सायकल जप्त करण्यात (Police arrested bike thief) आल्या आहेत.

उस्मानाबाद पोलिसांना गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पाळत ठेवून ही कारवाई केली. आरोपी पुणे येथून दुचाकी चोरून आणून त्यावरील मुळ चेसी क्रमांक आणि इंजिन क्रमांक पुसून त्यावर इतरत्र वापरत होते. तसेच त्याच कंपनी-मॉडेल- मोटारसायकलचा चीसी-इंजिन क्रमांक टाकून त्यांची विक्री करीत असत. मोटारसायकलचे बनावट वाहन नोंदणी प्रमाणपत्रही (RC Book) पोलिसांनी जप्त केली आहेत. या वर्षातील ही सर्वात मोठी कारवाई आहे.

पोलीस अधीक्षक राजतिलक रौशन आणि अप्पर पोलीस अधीक्षक संदीप पालवे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक डी.एम.शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक पी.व्ही.माने, पोलीस हेड कॉनस्टेबल जगताप, पोना शेळके, चव्हाण, दहिहंडे, कावरे, पोलीस कॉनस्टेबल- सावंत, लाव्हरे पाटील, अशमोड, आरसेवाड, मरलापल्ले याच्या पथकाने ही कारवाई केली.