प्रत्येक पालखीसाठी इन्सिडेंट कमांडर, 20 वारकऱ्यांसह पंढरपूरची पालखी बसने मार्गस्थ होणार

| Updated on: Jun 28, 2020 | 8:29 AM

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा पायी वारी सोहळा रद्द करण्यात आला (Pandharpur wari will go by Bus) आहे.

प्रत्येक पालखीसाठी इन्सिडेंट कमांडर, 20 वारकऱ्यांसह पंढरपूरची पालखी बसने मार्गस्थ होणार
Follow us on

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा पायी वारी सोहळा रद्द करण्यात आला (Pandharpur wari will go by Bus) आहे. यंदा बसने पंढरीच्या पालखीची वारी होणार आहे. त्यामुळे पांडुरंगाच्या चरणी संतांच्या पादुका अर्पण होण्याची अखंडित परंपरा कायम राहणार (Pandharpur wari will go by Bus) आहे.

या वारीसाठी सरकारकडून काही नियम देण्यात आले आहेत. बसने जाणाऱ्या संतांच्या पालख्या रस्त्यात कोठेही न थांबता पंढरपूरसाठी मंगळवारी प्रस्थान होणार आहे. संत श्री ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज, संत सोपानदेव महाराज आणि संत चांगावटेश्वर यांच्या पालख्या पंढरपूरला प्रस्थान करणार आहेत.

या सर्व पालख्या वेगवेगळ्या बसच्या माध्यमातून पंढरपूरला रवाना होणार आहेत. मात्र सर्व पालख्या मंगळवारी 30 जून रोजी रात्री अकरा वाजेपर्यंत पंढरपुरात आगमन होणे आवश्यक आहे.

प्रत्येक पालखीसोबत बसमधून केवळ वीस वारकऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे. तसेच पालखी रस्त्यात दर्शनासाठी थांबवता येणार नाही. पालखीबरोबर जाणाऱ्या वारकऱ्यांना प्रतिबंधक नियम पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यासोबत कोरोना टेस्ट करणं बंधनकारक आहे.

सरकारकडून प्रत्येक पालखीसाठी इन्सिडेंट कमांडर म्हणून उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे. इन्सिडेंट कमांडर पादुका प्रस्थान केल्यापासून प्रस्थानच्या ठिकाणी पुन्हा येईपर्यंत पालखीसोबत राहणार आहे.

पालखीत साठ वर्षावरील वारकऱ्यांना मनाई आहे. बससोबत पुढे आणि मागे बंदोबस्त करणारी वाहने असणार आहेत. पंढरपूर आणि पुन्हा पंढरपूरपासून देवस्थानापर्यंत सोबत राहणार आहेत. बस मधून जाणाऱ्या वारकर्‍यांची यादी सोलापूर जिल्हाधिकार्‍यांना पाठवणं आवश्यक आहे.

संबंधित बातम्या :

Palkhi Sohala 2020 | तुकोबा- एकनाथांच्या पालख्यांचं प्रस्थान, सोशल डिस्टन्सिंगसह मोजकेच वारकरी

तुला कापूनच टाकतो, वारकरी संप्रदायाच्या महाराजांकडून तृप्ती देसाईंना धमकी