पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 300 पार, कोणत्या प्रभागात किती रुग्ण?

| Updated on: May 23, 2020 | 11:35 PM

पिंपरी-चिंचवडमध्ये दिवसभरात 41 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा 300 पार पोहोचला आहे. (Pimpari Chinchwad Corona Cases Update)

पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 300 पार, कोणत्या प्रभागात किती रुग्ण?
Follow us on

पिंपरी-चिंचवड : राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 47 हजार 190 वर पोहोचला (Pimpari Chinchwad Corona Cases Update) आहे. पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढ होत आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये दिवसभरात 41 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील कोरोनाबाधितांचा आकडा 300 पार पोहोचला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात दिवसभरात 37 तर शहराबाहेरील 4 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह (Pimpari Chinchwad Corona Cases Update) आले आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरात एकूण 311 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. तर दुसरीकडे शहराबाहेरील 48 रुग्णांची चाचणी कोरोना पॉझिटिव्ह आली आहे.

तसेच पिंपरी-चिंचवड शहरातील 8 आणि शहराबाहेरील 2 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यानुसार पिंपरी- चिंचवडमध्ये आतापर्यंत 169 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तर दुर्देवाने 7 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने 23 मे 2020 पर्यंतची कोरोना पॉझिटिव्ह आणि रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांची क्षेत्रीय कार्यालय निहाय आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार, पिंपरी-चिंचवड शहरातील ‘अ’ प्रभागात सर्वाधिक 86 रुग्ण आहेत.

पिंपरी-चिंचवडमधील कोरोना रुग्णांची क्षेत्रनिहाय आकडेवारी

प्रभाग – परिसर – रुग्ण

1) प्रभाग अ – निगडी, प्रधिकरण, आकुर्डी (86)

2) प्रभाग ब – काळेवाडी, चिंचवड, रावेत (06)

3) प्रभाग क – इंद्रायणीनगर, नेहरूनगर, अजमेरा कॉलनी (05)

4) प्रभाग ड – वाकड, पिंपळे-सौदागर, ताथवडे (10)

5) प्रभाग ई – भोसरी, मोशी, चऱ्होली (12)

6) प्रभाग फ – यमुनानगर, तळवडे, चिखली (06)

7) प्रभाग ग – पिंपरी, थेरगाव, रहाटणी (07)

8) प्रभाग ह – दापोडी, कासरवाडी, सांगवी (03)

(Pimpari Chinchwad Corona Cases Update)

संबंधित बातम्या : 

Maharashtra Corona Update | राज्यात दिवसभरात 2,608 रुग्णांची भर, तर 60 जणांचा कोरोनाने मृत्यू

कोल्हापुरात कोरोनाचा कहर सुरुच, 14 नवे रुग्ण, बाधितांचा आकडा तीनशेच्या दिशेने