पिंपरी चिंचवडमध्ये एका दिवसातील सर्वाधिक ‘कोरोना’ रुग्ण, कोणत्या प्रभागात किती?

| Updated on: May 19, 2020 | 10:53 AM

पिंपरी चिंचवड शहरातील 22, तर शहराबाहेरील 2 रुग्ण काल कोरोना पॉझिटिव्ह आढळले. (Pimpari Chinchwad Ward wise Corona Patients)

पिंपरी चिंचवडमध्ये एका दिवसातील सर्वाधिक कोरोना रुग्ण, कोणत्या प्रभागात किती?
Follow us on

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहरात काल (18 मे) एकाच दिवसात 24 रुग्णांना ‘कोरोना’ची लागण झाल्याचं समोर आलं आहे. एका दिवसात पहिल्यांदाच इतक्या रुग्णांची नोंद झाली. सध्या निगडी, प्राधिकरण, आकुर्डी भागात सर्वाधिक 37 रुग्ण उपचाराधीन आहेत. (Pimpari Chinchwad Ward wise Corona Patients)

पिंपरी चिंचवड शहरातील 22, तर शहराबाहेरील 2 रुग्ण काल कोरोना पॉझिटिव्ह आढळले. आतापर्यंत पिंपरी चिंचवड शहरातील 226 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या 91 जणांवर उपचार सुरु आहेत.

कालच्या दिवसात 6 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत शहरातील 131 रुग्ण, तर शहराबाहेरील एकूण 10 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. उपचारासाठी शहराबाहेरील 30 रुग्ण दाखल आहेत.

हेही वाचा : पुणे जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 4 हजारांच्या पार, कुठे किती रुग्ण?

पिंपरी चिंचवड शहरातील 4 कोरोना रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला, तर शहराबाहेरील 8 कोरोना रुग्णांना प्राण गमवावे लागले. महापालिका रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या रुग्णांची संख्या 91 इतकी आहे

पिंपरी चिंचवड महानगरपालिका 18 मे 2020 पर्यंतची कोरोना पॉझिटिव्ह आणि रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांची क्षेत्रीय कार्यालयनिहाय आकडेवारी

1) प्रभाग अ – निगडी, प्राधिकरण, आकुर्डी- 37

2) प्रभाग ब – काळेवाडी, चिंचवड, रावेत- 04

3) प्रभाग क – इंद्रायणीनगर, नेहरूनगर, अजमेरा कॉलनी- 11

4) प्रभाग ड – वाकड, पिंपळे-सौदागर, ताथवडे- 05

5) प्रभाग ई – भोसरी, मोशी, चऱ्होली – 15

6) प्रभाग फ – यमुनानगर, तळवडे, चिखली – 09

7) प्रभाग ग – पिंपरी, थेरगाव, रहाटणी – 04

8) प्रभाग ह – दापोडी, कासरवाडी, सांगवी – 06