तिकिटावर मोदींचा फोटो, रेल्वेचे चार कर्मचारी निलंबित

लखनऊ : लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराबाबत निवडणूक आयोगाने आता कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. निवडणूक आयोगाने सोमवारी आचारसंहितेचं उल्लंघन करणाऱ्या काही नेत्यांच्या प्रचारावर बंदी घातली. त्यानंतर आता रेल्वे तिकिटावर पंतप्रधान मोदींचा फोटो छापल्याप्रकरणी रेल्वेच्या चार कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. याप्रकरणी निवडणूक आयोगाने रेल्वे विभागाला नोटीस बजावली होती. उत्तर प्रदेशच्या बाराबांकीहून वाराणसीकडे जाणाऱ्या गंगा सतलज […]

तिकिटावर मोदींचा फोटो, रेल्वेचे चार कर्मचारी निलंबित
| Updated on: Jul 05, 2019 | 4:02 PM

लखनऊ : लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराबाबत निवडणूक आयोगाने आता कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. निवडणूक आयोगाने सोमवारी आचारसंहितेचं उल्लंघन करणाऱ्या काही नेत्यांच्या प्रचारावर बंदी घातली. त्यानंतर आता रेल्वे तिकिटावर पंतप्रधान मोदींचा फोटो छापल्याप्रकरणी रेल्वेच्या चार कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. याप्रकरणी निवडणूक आयोगाने रेल्वे विभागाला नोटीस बजावली होती.

उत्तर प्रदेशच्या बाराबांकीहून वाराणसीकडे जाणाऱ्या गंगा सतलज एक्स्प्रेस (13308) या गाडीच्या थर्ड एसीच्या तिकिटावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटा होता. हा फोटो प्रधानमंत्री आवास योजनेच्या जाहिरातीसंबंधित होता. याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली. निवडणूक आयोगाने यावर कारवाई करत रेल्वेला नोटीस बजावली. त्यानंतर रेल्वेने याप्रकरणी चार अधिकाऱ्यांना निलंबित केलं.


यापूर्वीही रेल्वेमध्ये निवडणूक प्रचारावरुन गोंधळ झाला होता. पंतप्रधान मोदींचा फोटो आणि ‘मैं भी चौकीदार’ लिहिलेल्या कपमध्ये चहा दिला जात होता. याप्रकरणीही निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर हे कप हटवण्यात आले.

निवडणूक प्रचारासंबंधी कठोर कारवाई न केल्याने सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी निवडणूक आयोगाला सुनावलं होतं. त्यानंतर निवडणूक आयोगाने आचारसंहितेचा भंग करणाऱ्या नेत्यांवर प्रचार बंदी लावली. प्रचार संभांमध्ये चुकीची वक्तव्य केल्याने निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर 72 तास, बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांच्यावर 48 तास, समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांच्यावर 72 तास आणि भाजपच्या केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांच्यावर 48 तासांची प्रचारबंदी घालण्यात आली आहे. या दरम्यान हे नेते निवडणूक प्रचार, रोड शो किंवा इंटरव्ह्यू असे निवडणुकीच्या प्रचाराशी संबधित कोणत्याही गोष्टीत सहभागी होऊ शकणार नाहीत.

VIDEO :

संबंधित बातम्या :

आझम खान यांना 72 तास, तर मनेका गांधींना 48 तास प्रचारबंदी

योगींना 72 तास, तर मायवतींना 48 तास प्रचारबंदी, निवडणूक आयोगाची कारवाई

संभावित आघाडीत बिघाडी, केजरीवाल आणि राहुल गांधी ट्विटरवरच भिडले

राजकीय पक्षांचा बँक बॅलन्स, भाजप पाचव्या नंबरवर, श्रीमंत कोण?