PM Modi in Leh | पंतप्रधान मोदींचा अचानक लेह दौरा, जवानांना सातवी ‘सरप्राईझ’ भेट

| Updated on: Jul 03, 2020 | 12:47 PM

जगातील सर्वोच्च रणभूमी, सियाचीनमध्ये जाऊन दरवर्षी दिवाळी जवानांसह साजरी करण्याची सुरु केलेली परंपरा पंतप्रधान नरेंद्र मोदी अद्यापही पाळत आहेत.

PM Modi in Leh | पंतप्रधान मोदींचा अचानक लेह दौरा, जवानांना सातवी सरप्राईझ भेट
Follow us on

श्रीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी अचानक लेह-लडाखचा दौरा केला. पंतप्रधान मोदींनी लष्कर, वायुसेना आणि इंडो तिबेट सीमा पोलिस (आयटीबीपी) जवानांशी संवाद साधला. पंतप्रधान मोदी यांनी जवानांना चकित करण्यासाठी याआधीही अशा अकस्मात भेटी दिल्या घेत आहेत. दरवर्षी जवानांसोबत दिवाळी साजरी करण्याची परंपरा ते अद्याप पाळत आहेत. (PM Narendra Modi Surprise Visits to Jawans)

लेह-लडाख दौऱ्यात मोदींनी गलवान खोऱ्यातील धुमश्चक्रीत जखमी झालेल्या जवानांची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. पंतप्रधान मोदींसोबत मुख्य संरक्षण सचिव CDS बिपीन रावतदेखील लेह दौऱ्यावर आहेत. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तणाव असताना थेट पंतप्रधान तिथे पोहोचल्याने भारताची आक्रमक भूमिका दिसून येत आहे.

जवानांसोबत दिवाळी साजरी करण्याची परंपरा

दिवाळी 2019 – राजौरी, जम्मू काश्मीर

पंतप्रधान मोदींनी जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर (एलओसी) तैनात असलेल्या जवानांसोबत गेल्या वर्षी (2019) दिवाळी साजरी केली होती. त्यांच्या सरप्राईझ भेटीमुळे जवानांना अत्यानंद झाला होता. पंतप्रधानांनी बीजी ब्रिगेड मुख्यालयात जवानांना स्वत: मिठाई भरवली होती.

दिवाळी 2018 – हा‍रसिल, उत्तराखंड

पंतप्रधान नरेंद्र मोदी 2018 मधील दिवाळीत उत्तराखंडमधील हा‍रसिल येथे जवानांना भेटायला गेले होते. त्यावेळी त्यांनी केदारनाथ मंदिराचे दर्शनही घेतले होते.

दिवाळी 2017 – गुरेज, जम्मू काश्मीर

पंतप्रधान मोदींनी 2017 ची दिवाळीही एलओसीजवळ साजरी केली होती. ते काश्मीरच्या गुरेज सेक्टरमध्ये तैनात जवानांना भेटायला गेले होते. आर्मी जॅकेट घालून पंतप्रधान मोदींनी सैनिकांना संबोधित केले होते. ‘जेव्हा जेव्हा मी तुमच्याशी हस्तांदोलन करतो, तेव्हा मला मोठी ऊर्जा मिळते. या कठीण परिस्थितीतही तुम्ही कशाप्रकारे तपश्चर्या आणि त्‍याग करत आहात, हे मी पाहतोय” असं मोदी म्हणाले होते.

दिवाळी 2016 – लाहौल-स्पीती, हिमाचल प्रदेश

2016 मधील दिवाळी पंतप्रधान मोदींनी भारत-चीन सीमेवर साजरी केली होती. त्यावेळी ते आयटीबीपी, लष्कर आणि डोगरा स्काऊट्सच्या जवानांच्या उत्सवात सामील झाले होते. हिमाचल प्रदेशच्या लाहौल-स्पीतीमध्ये पंतप्रधान मोदींनी आयटीबीपी-आर्मी बेस कॅम्पमध्ये जवानांसह 15-20 मिनिटे गप्पा मारुन त्यांना मिठाई वाटली होती.

दिवाळी 2015 – अमृतसर, पंजाब

नरेंद्र मोदी यांनी 2015 मधील दिवाळी अमृतसरमध्ये साजरी केली होती. त्यानंतर डोगराय युद्ध स्मारकात जाऊन त्यांनी 1965 च्या युद्धाच्या शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली होती. त्यानंतर जवानांसह त्यांनी काही क्षण घालवले.

दिवाळी 2014 – सियाचीन

2014 मध्ये सत्तारुढ झाल्यानंतर पहिल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सियाचीनमधील सैनिकांसह दिवाळी साजरी केली. जगातील सर्वोच्च रणभूमी, सियाचीनमध्ये जाऊन दरवर्षी दिवाळी जवानांसह साजरी करण्याची सुरु केलेली परंपरा पंतप्रधान नरेंद्र मोदी अद्यापही पाळत आहेत.

संबंधित बातम्या :

पंतप्रधान मोदी अचानक लेह-लडाखमध्ये, कुणालाही कानोकान खबर नाही

पंतप्रधानांचा लेह-लडाख दौरा, नरेंद्र मोदी यांच्या भेटीचे 10 महत्त्वाचे मुद्दे

(PM Narendra Modi Surprise Visits to Jawans)