नाद खुळा! जुन्नर तालुक्यात 125 फुटी बॅनर, तुमचा तर फोटो नाही ना यात?

| Updated on: Dec 14, 2020 | 1:03 AM

पुण्यात जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात असाच प्रकार पाहायला मिळाला. जुन्नरमध्ये आपल्या प्रसिद्धीसाठी एकाने थेट 125 फुटी बॅनर लावला आहे.

नाद खुळा! जुन्नर तालुक्यात 125 फुटी बॅनर, तुमचा तर फोटो नाही ना यात?
Follow us on

पुणे : प्रसिद्धीसाठी कोण काय करेल याचा काही नेम नाही. त्यात विषय पुण्याचा असेल तर मग बोलायलाच नको. याआधीही पुण्यातील नागरिकांनी प्रसिद्धीसाठी अनेक नवे ट्रेंड सेट केले आहेत. आता पुण्यात जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात असाच प्रकार पाहायला मिळाला. जुन्नरमध्ये आपल्या प्रसिद्धीसाठी एकाने थेट 125 फुटी बॅनर लावला आहे. इतकंच नाही, तर आपले किती समर्थक आहेत याचं प्रदर्शन करण्यासाठी या पट्ठ्याने शेकडो लोकांच्या फोटोंचा कोलाजच तयार केलाय. त्यामुळे या बॅनरजी जोरदार चर्चा आहे (Political Banner Flex of 125 Feet in Junnar Pune for publicity)

राजकारणात प्रसिध्दीसाठी कोण काय करेल याची शाश्वती नाही. जुन्नरमधील हा बॅनरबाजीचा प्रकारही राजकीय प्रसिद्धीचाच स्टंट दिसतो आहे. अशा बॅनरबाजीत मग आपली संबंधित राजकीय नेत्याशी निष्ठा दाखवण्यासाठी काहीही केलं जातं. मग अगदी या बॅनरबाजाने याआधी कितीही पक्ष बदललेले का असेना. सोयीचं राजकारण कसं करता येईल आणि आपण आपल्या पक्षाशी किती निष्ठावान आहोत हे दाखवण्यासाठी स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांची चांगलीच स्पर्धा सुरु असते. मात्र, जुन्नरच्या या बॅनरबाजीने या स्थानिक कार्यकर्त्यांच्या प्रसिद्धीचा नवा फंडा समोर आणलाय.

जुन्नर तालुक्यात या वेगळ्याच “फ्लेक्सबाजीच्या” माध्यमातून राजकीय हवा सुरु झाली आहे. विशेष म्हणजे ही साधीसुधी बॅनरबाजी नसून तब्बल 125 फूट बॅनरवर 6 हजार 500 फोटो छापण्यात आलेत. हे बॅनर राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याचं आहे. त्याने या फ्लेक्सवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही फोटो छापला आहे. त्यावरुन हा कार्यकर्ता अजित पवार यांचा समर्थक असल्याचं दिसत आहे.

अनेकदा रस्त्याच्या कडेला प्रसिद्धीच्या हव्यासापायी लावण्यात आलेले हे बॅनर पडून रस्त्यावरील प्रवाशांना आपला जीवही गमवावा लागलाय. मात्र, त्यानंतरही राजकीय आश्रय असलेल्या या बॅनरबाजीवर अंकुश आलेला नाही. आता या बॅनरची वाहतुकीच्या दृष्टीने तपासणी होऊन कारवाई होणार की नाही हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

संबंधित व्हिडीओ :

हेही वाचा :

अनधिकृत पोस्टर पडून तरुणीचा मृत्यू, माजी आमदार म्हणतो वाऱ्यावर गुन्हा नोंदवा

उद्धव ठाकरेंच्या कौतुकाचे मुंबईत होर्डिंग, विरोधकांकडून कोरोना रुग्णसंख्येत महाराष्ट्र चीनच्या पुढे गेल्याची आठवण

आमच्या येथे डिपॉझिट जप्त करुन मिळेल, बारामतीत ‘पुणेरी’ पाट्या!

Political Banner Flex of 125 Feet in Junnar Pune for publicity