गर्भवती आणि स्तनदा महिलांसाठी मतदान केंद्रावर विशेष कक्ष

| Updated on: Sep 22, 2019 | 8:15 AM

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचं बिगुल अखेर वाजलेलं आहे. विधानसभा निवडणुकांसाठी (Maharashtra Assemble Election) सोमवार 21 ऑक्टोबर 2019 रोजी मतदान होणार आहे.

गर्भवती आणि स्तनदा महिलांसाठी मतदान केंद्रावर विशेष कक्ष
Follow us on

बुलडाणा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचं बिगुल अखेर वाजलेलं आहे. विधानसभा निवडणुकांसाठी (Maharashtra Assemble Election) सोमवार 21 ऑक्टोबर 2019 रोजी मतदान होणार आहे, तर गुरुवार 24 ऑक्टोबर 2019 रोजी मतमोजणी पार पडणार आहे, अशी माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. या निवडणुकी दरम्यान बुलडाणा जिल्ह्यात मतदान केंद्रावर गर्भवती आणि स्तनदा महिलांसाठी प्रथमच विशेष कक्ष (Pregnant Women Section on voting center) उघडणार आहे, असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

बुलडाणा जिल्ह्यात 7 विधानसभा मतदारसंघ येतात. या मतदारसंघात आचारसंहितेच काटेकोर पालन करण्यात येणार आहे. तसेच जिल्हाधिकारी गर्भवती आणि स्तनदा महिलांची (Pregnant Women Section on voting center) विशेष काळजी घेणार आहे. त्यामुळे मतदानासाठी येणाऱ्या महिलांना याचा फायदा होईल, असं जिल्हाधिकारी म्हणाले.

बुलडाणा जिल्ह्यात एकूण 7 विधानसभा मतदारसंघ असून त्यात 20 लाख 39 हजार 435 मतदार संख्या आहे, तर 2263 मतदार केंद्र असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. तसेच या विधानसभा निवडणुकीच्या वेळी प्रथमच प्रत्येक मतदार केंद्रावर गर्भवती महिला आणि स्तनदा महिलांसाठी कक्ष उघडण्यात येणार आहे.

विशेष म्हणजे आचारसंहितेचे कडक पालन करण्यात येणार असून सी विजिल अॅपच्या माध्यमातून येणाऱ्या तक्रारीची योग्य दखल घेऊन कारवाई करण्यात येणार आहे आणि यासाठी विविध पथकेही स्थापन करण्यात आली आहेत.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी महत्त्वाच्या तारखा

अधिसूचना जारी करण्याची तारीख – शुक्रवार 27 सप्टेंबर 2019
नामांकन अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख – बुधवार 4 ऑक्टोबर 2019
अर्जाची छाननी – गुरुवार 5 ऑक्टोबर 2019
अर्ज मागे घेण्याची तारीख – शनिवार 7 ऑक्टोबर 2019
मतदान – सोमवार 21 ऑक्टोबर 2019
मतमोजणी – गुरुवार 24 ऑक्टोबर 2019