पोलीस दलात महिला कर्मचाऱ्यांचे प्रमाण 30 टक्क्यांवर नेणार, अनिल देशमुख यांची माहिती

| Updated on: Mar 09, 2020 | 10:05 AM

राज्यातील पोलीस दलामध्ये महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्रमाण 15 टक्क्यांवरुन 30 टक्क्यापर्यंत नेण्यात येणार (Women Police Increase) आहे.

पोलीस दलात महिला कर्मचाऱ्यांचे प्रमाण 30 टक्क्यांवर नेणार, अनिल देशमुख यांची माहिती
Follow us on

मुंबई : राज्यातील पोलीस दलामध्ये महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्रमाण 15 टक्क्यांवरुन 30 टक्क्यापर्यंत नेण्यात येणार (Women Police Get Increase) आहे. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिला सुरक्षा पदयात्रा (मार्च) काढण्यात आली. त्यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याबाबतची माहिती दिली.

राज्याच्या पोलीस दलात सुमारे (Women Police Get Increase) सव्वादोन लाख अधिकारी, कर्मचारी आहेत. त्यापैकी सुमारे 28 हजार म्हणजेच 15 टक्क्यांच्या आसपास महिला आहेत. त्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये उत्कृष्ट काम बजावत आहेत. महिला पोलिसांचे प्रमाण वाढवून 30 टक्क्यांपर्यंत नेण्यासाठी शासनाचा प्रयत्न राहील, असे अनिल देशमुख म्हणाले.

एकाच वेळी अनेक जबाबदाऱ्या त्या सक्षमतेने सांभाळत आहेत. घर आणि कुटुंब सांभाळून विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिला आदर्शवत काम करत आहेत, असेही अनिल देशमुख म्हणाले.

समाजात घडणाऱ्या महिलांवरील अत्याचाराच्या घटना दुर्दैवी आहेत. राज्य शासन या बाबतीत अत्यंत संवेदनशील असून अशा दुर्दैवी घटनांना पायबंद घालण्यासाठी नवीन कायदा करत आहे. महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे पोलिसांकडून संवेदनशीलरित्या हाताळली जातात. मात्र तपासामध्ये अधिक गतिमानता तसेच लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी विशेष तरतूद या कायद्यात करण्यात येणार आहे, असेही अनिल देशमुख यांनी (Women Police Get Increase) सांगितले.