पुण्यात ‘स्पेशल 26’, लष्कर भरती रॅकेटचा भांडाफोड, लष्कराच्या कर्मचाऱ्यांचाही सहभाग

न्हे शाखेच्या पोलिसांनी लष्कराच्या गुप्तचर विभागाच्या सहकार्याने टोळीला अटक केली आहे.

पुण्यात 'स्पेशल 26', लष्कर भरती रॅकेटचा भांडाफोड, लष्कराच्या कर्मचाऱ्यांचाही सहभाग
Follow us
| Updated on: Nov 02, 2020 | 10:04 AM

पुणे : पुण्यात लष्कर भरतीतील रॅकेटचा भांडाफोड करण्यात आला आहे (Army Recruitment Racket). लष्कर गुप्तचर आणि पुणे शहर गुन्हे शाखेने कारवाई करत या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे लष्करात भरती करुन देण्याच्या आमिषाने 19 जणांची फसवणूक करण्यात आल्याचं उघड झालं आहे (Army Recruitment Racket).

वानवडी येथील लष्करी प्रशिक्षण संस्था (एआयपीटी) येथे झालेल्या लष्करातील भरतीच्या लेखी परीक्षेत उत्तीर्ण करण्याचे आमिष दाखवून तरुणांकडून लाखो रुपये उकळल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी लष्कराच्या गुप्तचर विभागाच्या सहकार्याने टोळीला अटक केली आहे. त्यामध्ये लष्कराच्या भरती कार्यालयातील कर्मचाऱ्याचाही सहभाग आहे.

वेनसिंग लालासिंग रावत (वय 45), रवींद्र राठोड असे पोलिसांनी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. तर जयदेव सिंह परिहार हा लष्करी भरती कार्यालयातील कर्मचारी आहे.

याप्रकरणी अक्षय साळुंखे या तरुणाने वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वानवडी येथील ‘एआयपीटी’ या संस्थेत रविवारी सैन्य भरतीसाठीची लेखी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेला बसणाऱ्या काही तरुणांना परीक्षेत उत्तीर्ण करण्याचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक केली जात असल्याची खबर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त बच्चन सिंह यांना प्राप्त झाली होती. त्यानुसार, गुन्हे शाखेचे युनिट दोन आणि युनिट पाच अशी दोन पथके आणि लष्करी गुप्तचर विभागाचे अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी संयुक्त कारवाई करुन शनिवारी रात्री रावत आणि राठोड यांना ताब्यात घेतले (Army Recruitment Racket).

लष्करी गुप्तचर विभाग आणि पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे विचारपूस केली, त्यावेळी त्यांनी रविवारी होणाऱ्या लेखी परीक्षेसाठी 19 मुलांशी संपर्क साधला होता. रावत याने ‘लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आपली ओळख असून मी तुम्हाला लेखी परीक्षेत उत्तीर्ण करतो’, असे तरुणांना सांगितले होते. तसेच काम झाल्यानंतर त्याने प्रत्येकी एक ते दोन लाख रुपयांची तरुणांकडे मागणी केली होती. त्यासाठी त्याने तरुणांकडून त्यांची मूळ कागदपत्रे ताब्यात घेतली होती.

संबंधित 19 मुलांना पंधरा दिवसांपासून लोहगाव येथे एकत्र आणून एका शिक्षकाची नेमणूक करुन त्यांचे वर्ग घेतले जात होते. स्वतःच्या बुद्धिमत्तेवर आणि क्षमतेवर उत्तीर्ण होणाऱ्या मुलांकडूनच ‘मी तुम्हाला लेखी परीक्षेत उत्तीर्ण केले,’ असे सांगून निवड झालेल्या तरुणांना ठरलेली रक्कम दिल्यानंतरच त्यांची मूळ कागदपत्रे परत देण्यात येतील, असं राठोड याने या मुलांना सांगितल होतं.

Army Recruitment Racket

संबंधित बातम्या :

अकोल्यात दारु पिताना वाद, अकोल्यात कुख्यात आरोपीची दगडाने ठेचून हत्या, दोघांना अटक

मुंबईतून मुलीला फूस लावून पळवून नेलं; तरुणाला आठ महिन्यांनी नांदेडमधून अटक

भररस्त्यात विनयभंग केल्याने तरुणीची आत्महत्या; जमावाने घरात घुसून तरुणाला बदडले

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.