अकोल्यात दारु पिताना वाद, अकोल्यात कुख्यात आरोपीची दगडाने ठेचून हत्या, दोघांना अटक

दारु पिताना झालेल्या वादातून या आरोपीची दगडानं ठेचून हत्या करण्यात आल्याचं तपासात समोर आलं आहे.

अकोल्यात दारु पिताना वाद, अकोल्यात कुख्यात आरोपीची दगडाने ठेचून हत्या, दोघांना अटक

अकोला : अकोल्यात कुख्यात आरोपीची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली होती (Notorious Accused Murdered). अकोला पोलिसांनी अवघ्या दोन दिवसांत या हत्येचा छडा लावत दोघांना अटक केली आहे (Notorious Accused Murdered).

दारु पिताना झालेल्या वादातून या आरोपीची दगडानं ठेचून हत्या करण्यात आल्याचं तपासात समोर आलं आहे. गुरुवारी (29 ऑक्टोबर) रात्री उशिरा अकोला शहरातील न्यू तापडिया नगरातील निर्माणाधीन पुलाजवळ ही घटना घडली.

काल (30 ऑक्टोबर) ही घटना उघडकीस आली असून मोनू काकड असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. सुहास वाकोडे आणि ऋषिकेश बाबर असं मारेकऱ्यांची नावे आहेत. सुहास, ऋषिकेश आणि मृतक मोनू काकड हे गुरुवारी रात्री 10.30 वाजताच्या सुमारास दारु पित होते. त्यावेळी यांच्यात क्षुल्लक कारणावरुन शाब्दिक वाद झाला.

त्यामुळे संतापलेल्या सुहास आणि ऋषिकेशने मोनूच्या डोक्यावर दगडानं वार केला. यात मोनू काकडचा जागीच मृत्यू झाला. सध्या पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे. या दरम्यांनं, मृतक मोनू काकड हा गुन्हेगार पार्श्वभूमीचा असून त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहे.

Notorious Accused Murdered

संबंधित बातम्या :

बाप-बेटा नात्याला काळीमा फासणारी घटना, वडिलांचा ओरडण्याचा राग मनात ठेऊन हत्या

पत्नीवर वाईट नजर, अश्लील संवाद, वर्ध्यात पतीकडून मित्राची दगडाने ठेचून हत्या

शॉपिंगचे पैसे संपले म्हणून नवी मुंबईतील विक्रीकर अधिकाऱ्यावर हल्ला करुन लुटलं, बुलडाण्यात तिघांना अटक

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *