बाप-बेटा नात्याला काळीमा फासणारी घटना, वडिलांचा ओरडण्याचा राग मनात ठेऊन हत्या

वडिलांच्या ओरडण्याचा राग मनात ठेवून एका 17 वर्षीय मुलाने आपल्या वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना मथुरा येथे घडली आहे (Minor kills father and took cue from Crime patrol serial to destroy evidence).

बाप-बेटा नात्याला काळीमा फासणारी घटना, वडिलांचा ओरडण्याचा राग मनात ठेऊन हत्या

पाटणा : वडिलांच्या ओरडण्याचा राग मनात ठेवून एका 17 वर्षीय मुलाने आपल्या वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना मथुरा येथे घडली आहे. विशेष म्हणजे तो एवढ्यावरच थांबला नाही. त्याने हत्येचे सर्व पुरावे नष्ट करण्यासाठी आपल्या वडिलांचा मृतदेह रॉकेल टाकून जाळून टाकला. या कृत्यासाठी त्याने ‘क्राईम पेट्रोल’ या मालिकेचे 100 पेक्षा जास्त भाग मोबाईलवर बघितल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे (Minor kills father and took cue from Crime patrol serial to destroy evidence).

मथुऱ्यात 42 वर्षीय मनोज मिश्रा यांचा मुलगा 12 वी इयत्तेत शिक्षण घेत होता. मनोज मिश्रा काही कारणास्तव आपल्या मुलावर नाराज झाले, ते मुलाला ओरडले. मात्र, या ओरडण्याचा राग मनात ठेऊन त्यांच्या मुलाने 2 मे रोजी लोखंडी रॉड त्यांच्या डोक्यात टाकला. त्यानंतर त्याने कपड्याने वडिलांचा गळा आवळला. यामध्ये मनोज मिश्रा यांचा मृत्यू झाला.

वडिलांची हत्या केल्यानंतर मुलगा त्यांचा मृतदेह आईच्या मदतीने घरापासून पाच किमी लांब जंगलात घेऊन गेला. तिथे त्याने वडिलांचा मृतदेह रॉकेल टाकून जाळून दिला. त्यानंतर त्याने टॉयलेट क्लीनरच्या मदतीने सर्व पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला (Minor kills father and took cue from Crime patrol serial to destroy evidence).

पोलिसांना 3 मे रोजी जळालेला मृतदेह सापडला. मात्र, त्या मृतदेहाची ओळख पटू शकली नाही. याशिवाय आजूबाजूच्या परिसरातील पोलीस स्टेशनमध्ये कोणत्याही व्यक्तीच्या हरवण्याची तक्रार आली नव्हती.

मनोज मिश्रा इस्कॉनसाठी दान गोळा करण्याचं काम करायचे. त्याचबरोबर गीतेचा प्रचार करण्यासाठी यात्रांना जायचे. मात्र, ते अनेक दिवस तिथे न गेल्यामुळे अधिकाऱ्यांनी मिश्रा यांच्या कुटुंबीयांशी चौकशी केली. अखेर इस्कॉनच्या अधिकाऱ्यांच्या दबावाखाली मुलाने 27 मे रोजी मनोज मिश्रा यांच्या हरवल्याची तक्रार नोंद केली.

मिश्रा यांच्या काही मित्रांनी पोलिसांसोबत चर्चा केली. पोलिसांनी त्यांना 3 मे रोजी एक मृतदेह जळालेल्या स्वरुपात मिळाल्याची माहिती दिली. त्या मृतदेहासोबत चष्मादेखील मिळाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी मिश्रा यांच्या मित्रांना तो चष्मा दाखवला. चष्मा बघितल्यानंतर तो मिश्रा यांचाच असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे तो मृतदेह मनोज मिश्रा यांचाच असल्याचं स्पष्ट झालं.

दरम्यान, मथुरा पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरुच होता. तपासाचा एक भाग म्हणून पोलिसांनी मिश्रा यांच्या मुलाला चौकशीसाठी बोलवलं. मात्र, तो चौकशीसाठी येण्यास टाळाटाळ करत होता. पोलिसांनी त्याला कडक शब्दात हजर राहण्यास सांगितल्यावर तुम्ही कोणत्या कायद्याच्या आधारावर मला चौकशीसाठी बोलवत आहात? असा उलटप्रश्न मुलाने केला.

अखेर पोलिसांनी त्या मुलाची चौकशी केली. पोलिसांनी मुलाचा मोबाईल तपासला असता त्याने ‘क्राईम पेट्रोल’ मालिकेचा भाग 100 वेळा बघितल्याचं समोर आलं. त्यानंतर अखेर पोलिसांच्या चौकशीदरम्यान मुलाने आपला गुन्हा कबूल केला.

पोलिसांनी याप्रकरणी मुलाला आणि त्याची 39 वर्षीय आई संगीता मिश्राला अटक केली आहे. त्यांच्यावर हत्या करुन पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आरोपीची 11 वर्षीय लहान बहीण तिच्या आजी-आजोबांकडे सोपवण्यात आली आहे.

हेही वाचा : सुनेच्या विवाह बाह्य संबंधाला वैतागून सासऱ्याचे टोकाचे पाऊल, सून आणि प्रियकराला ट्रॅक्टरखाली चिरडलं

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *