बाकरवडी-श्रीखंडाची चव पुन्हा जिभेवर, लॉकडाऊनमध्येच ‘चितळे बंधू’ पुणेकरांच्या सेवेत

| Updated on: May 10, 2020 | 4:51 PM

पुणे महापालिकेने परवानगी दिल्यानंतर 'चितळे बंधू मिठाईवाले' मंगळवार, गुरुवार, शनिवार आणि रविवार या दिवशी दुकानं खुली राहणार आहेत (Pune Chitale Bandhu Mithaiwale reopen during Corona Lockdown)

बाकरवडी-श्रीखंडाची चव पुन्हा जिभेवर, लॉकडाऊनमध्येच चितळे बंधू पुणेकरांच्या सेवेत
Follow us on

पुणे : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे पुणेकरांना ‘चितळे’ची बाकरवडी, श्रीखंड आणि इतर पदार्थ चाखायला मिळत नव्हते. मात्र प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर ‘चितळे बंधू मिठाईवाले’ पुन्हा एकदा पुणेकरांच्या सेवेत रुजू होणार आहेत. लॉकडाऊन सुरु असतानाच नियम पाळून पुण्यात चितळेंच्या दुकानात विक्री सुरु होत आहे. (Pune Chitale Bandhu Mithaiwale reopen during Corona Lockdown)

लॉकडाऊनमधून सवलत मिळाल्यामुळे पुण्यातील ‘चितळे बंधू मिठाईवाले’ची सर्व दुकानं खुली होणार आहेत. पुणेकरांना आता ‘चितळें’ची बाकरवडी, श्रीखंड, लोणी, तूप पुन्हा चाखायला मिळणार आहे. तब्बल 50 दिवसांनी चितळेंची दुकानं उघडण्यात आल्याने पुणेकरांना हायसं वाटत आहे.

पुणे महापालिकेने परवानगी दिल्यानंतर मंगळवार, गुरुवार, शनिवार आणि रविवार या दिवशी दुकानं खुली राहणार आहेत. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत ग्राहकांना दुकानात खरेदी करता येणार आहे.

हडपसरमध्ये ‘जनता कर्फ्यू’

दरम्यान, पुण्यातील हडपसरमध्ये उद्यापासून पाच दिवसांचा ‘जनता कर्फ्यू’ घोषित करणात आला आहे. स्वयंस्फूर्तीने होणारा पुण्यातील हा पहिलाच जनता कर्फ्यू आहे.

हडपसर परिसरात तीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर ‘कोरोना’चा संसर्ग रोखण्यासाठी जनता कर्फ्यू पुकारण्यात आला आहे. (Pune Chitale Bandhu Mithaiwale reopen during Corona Lockdown)

हेही वाचा : मे महिन्याअखेरीस पुण्यातील रुग्णसंख्या 10 हजारावर पोहोचण्याचा अंदाज : आयुक्त 

यानुसार सकाळी 7 ते 9 या वेळेत वृत्तपत्र आणि दूध मिळणार आहे, मात्र किराणा, भाजीपाला, फळविक्री आणि इतर सर्व दुकानं बंद राहणार आहेत. जनता कर्फ्यूच्या काळात दवाखाने आणि मेडिकल सुरु राहणार आहेत.

पुण्यात कोरोनाग्रस्त वाढतेच

पुणे जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या सकाळपर्यंत 2 हजार 766 वर पोहोचली होती. पुणे जिल्ह्यात 12 तासात 34 कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढली. पुणे जिल्ह्यात आतापर्यंत 148 रुग्णांचे कोरोनामुळे प्राण गेले आहेत.

 

(Pune Chitale Bandhu Mithaiwale reopen during Corona Lockdown)