पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणूक आचारसंहितेचे काटेकोर पालन करा, विभागीय आयुक्तांच्या सूचना

| Updated on: Nov 03, 2020 | 11:53 PM

निवडणूक आदर्श आचारसंहिता अंमलात आणण्यासाठी निवडणूक आयोगाच्या सूचनांचे  काटेकोर पालन करण्याच्या सूचना पुणे विभागीय आयुक्त सौरभ यांनी दिल्या.

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणूक आचारसंहितेचे काटेकोर पालन करा, विभागीय आयुक्तांच्या सूचना
Follow us on

पुणेपुणे पदवीधर आणि पुणे शिक्षक मतदारसंघाची निवडणूक सोमवारी जाहीर झाली आहे. त्याची आदर्श आचारसंहिता लागू झाली असून निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता अंमलात आणण्यासाठी निवडणूक आयोगाच्या सूचनांचे  काटेकोर पालन करण्याच्या सूचना पुणे विभागीय आयुक्त सौरभ यांनी दिल्या. (pune Divisional Commissionor Saurabh Rao on teacher And Graduate Constituency Election)

विभागीय आयुक्त कार्यालयात निवडणूक विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांची बैठक विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपायुक्त प्रताप जाधव आणि निवडणूक यंत्रणेशी संबंधित अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीसाठी निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या सर्व सूचना, कोविड-19 च्या अनुषंगाने घ्यावयाची खबरदारी आदींबाबत आयुक्त राव यांनी सूचना केल्या.

प्रत्येक मतदान केंद्रावर सुरक्षित अंतर ठेवण्याबाबत दक्षता घेण्यात यावी तसेच अचूक, शास्त्रोक्त व समन्वयाने वेळेत कामे पूर्ण करण्याच्या सूचनाही विभागीय आयुक्त राव यांनी दिल्या. बैठकीत उपायुक्त जाधव यांनी निवडणुकीच्या तयारीची माहिती दिली.

राज्यातील 5 पदवीधर मतदारसंघांच्या निडणुकांसाठी 1 डिसेंबरला मतदान होणार असून आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणुकांचे निकाल 3 डिसेंबरला जाहीर होणार आहेत. निवडणूक आयोगाकडून राज्यात एकूण 5 जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये तीन जागा पदवीधर मतदारसंघ तर 2 जागा शिक्षक मतदारसंघाच्या आहेत. या पाच जागांसाठी पुढील महिन्यात (डिसेंबर) 1 तारखेला मतदान होईल तर 3 डिसेंबरला निवडणुकांचे निकाल जाहीर होतील, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.

औरंगाबाद पदवीधर मतदार संघातून सतीश चव्हाण आणि नागपूरमधून अनिल सोले यांचा कार्यकाळ जुलै महिन्यात संपला. तर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे निवडणूक जिंकून विधानसभेवर गेल्याने पुणे पदवीधर मतदारसंघाची जागा रिक्त राहिली. एकूण पदवीधर मतदारसंघाच्या तीन जागा रिक्त आहेत. तर शिक्षक मतदरासंघातून अमरावती विभातून श्रीकांत देशपांडे आणि पुणे विभागातून दत्तात्रय सावंत यांचा कार्यकाळसुद्धा जुलै महिन्यात संपला. त्यामुळे शिक्षक मतदारसंघातून अमरावती आणि पुणे विभागाच्या दोन जागा रिक्त आहेत. या पाचही जागांवर 1 डिसेंबरला मतदान होणार आहे.

(pune Divisional Commissionor Saurabh Rao on teacher And Graduate Constituency Election)

संबंधित बातम्या

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मराठा क्रांती मोर्चाची उडी

पुणे पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या प्रबळ दावेदाराची माघार

महापालिका निवडणुकीतून माघार, नागपूरचे महापौर आता पदवीधर मतदारसंघाच्या शर्यतीत