महापालिका निवडणुकीतून माघार, नागपूरचे महापौर आता पदवीधर मतदारसंघाच्या शर्यतीत

पक्षाने जबाबदारी दिल्यास पदवीधर मतदारसंघ निवडणूक लढवण्यास तयार असल्याचं संदीप जोशी यांनी सांगितलं आहे.

महापालिका निवडणुकीतून माघार, नागपूरचे महापौर आता पदवीधर मतदारसंघाच्या शर्यतीत

नागपूर : भाजपचं मिशन ‘पदवीधर मतदारसंघ निवडणूक’ सुरु झालं आहे. रणनीती ठरवण्यासाठी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस नागपुरात ठाण मांडून बसले आहेत. भविष्यात महापालिका निवडणूक न लढवण्याचा निर्धार केलेले नागपूरचे महापौर संदीप जोशीही रेसमध्ये असल्याची माहिती आहे. (Nagpur Mayor Sandeep Joshi likely to contest Graduate constituency election)

भाजपचे नागपूर पदवीधर मतदारसंघातील आमदार अनिल सोले निवृत्त झाल्यानंतर आता भाजपच्या इच्छुकांनी या जागेसाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. पुढील ठरवण्यासाठी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस नागपुरात ठाण मांडून बसले आहेत.

पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीबाबत देवेंद्र फडणवीस नागपुरात प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा करत असल्याची माहिती आहे. या निवडणुकीसाठी भाजपकडून इच्छुक उमेदवारांची मोर्चेबांधणी सुरु झाली आहे.

इच्छुक उमेदवारांनी नेत्यांच्या भेटीगाठी सुरु केल्या आहेत. भाजपकडून नागपूरचे महापौर संदीप जोशी रेसमध्ये आहेत. पक्षाने जबाबदारी दिल्यास तयार असल्याचं संदीप जोशी यांनी सांगितलं आहे.

“आपण चौथ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आला आहात. यापुढे आपण पुन्हा निवडणूक लढवणार की सर्वसामान्य कार्यकर्त्याला निवडणुकीची संधी द्याल?” असा सवाल एका कार्यकर्त्याने संदीप जोशी यांना फेसबुक लाईव्हदरम्यान विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना संदीप जोशी यांनी यापुढे महापालिकेची निवडणूक लढवणार नसल्याचं 20 ऑगस्टला आपल्या वाढदिवशी स्पष्ट केलं होतं. त्यामुळे जोशींनी आता पदवीधर मतदारसंघाची वाट चोखाळल्याचे दिसत आहे.

काय म्हणाले होते संदीप जोशी?

“अनेकदा नेत्यांनीच लढायचं आणि कार्यकर्त्यांनी फक्त सतरंज्याच उचलत राहायचं हे बरोबर नाही. मला वाढदिवसानिमित्त तुम्ही शुभेच्छा दिल्या आणि हा प्रश्नदेखील विचारलात. त्यामुळे वाढदिवसाच्या दिवशी आज मी कॅमेऱ्यासमोर जाहीर करतो की, यानंतर मी महापालिकेची निवडणूक लढवणार नाही. माझ्यानंतरचा जो कुणी कार्यकर्ता असेल, जो पक्षासाठी मेहनत करतोय, तो कार्यकर्ता माझ्या जागेवर लढेल. मी त्याचं काम करेन. पण यापुढे महापालिकेची कोणतीही निवडणूक लढवणार नाही”, असं संदीप जोशी म्हणाले. (Nagpur Mayor Sandeep Joshi likely to contest Graduate constituency election)

भाजपकडून प्रा. अनिल सोले यांना पुन्हा संधी मिळणार, की संदीप जोशींना पक्षाकडून उमेदवारी मिळणार? याबाबत भाजपच्या गोटात चर्चा सुरु झाली आहे.

संबंधित बातम्या :

चारवेळा नगरसेवक झालात, आता आम्हाला संधी द्या, कार्यकर्त्याची मागणी, महापौरांची निवडणूक न लढण्याची घोषणा

नागपूर शहरात धनदांडग्यांनी बेड अडवल्याने गरीब वंचित, खुद्द महापौरांची कबुली

(Nagpur Mayor Sandeep Joshi likely to contest Graduate constituency election)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *