पुणे पदवीधर निवडणूक : महायुतीतील घटकपक्षामुळे भाजपला डोकेदुखी, सदाभाऊ खोतांकडून उमेदवार जाहीर

| Updated on: Nov 12, 2020 | 11:01 AM

कोल्हापूरचे प्रा. एन. डी चौगुले यांना रयत क्रांती संघटनेने पुणे पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली

पुणे पदवीधर निवडणूक : महायुतीतील घटकपक्षामुळे भाजपला डोकेदुखी, सदाभाऊ खोतांकडून उमेदवार जाहीर
Follow us on

पुणे : पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत भाजपची डोकेदुखी वाढणार आहे. महायुतीतील घटकपक्ष असणाऱ्या रयत क्रांती संघटनेकडूनही उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे आधीच महाविकास आघाडीचं तगडं आव्हान असताना भाजपच्या अडचणी वाढणार आहेत. (Pune Graduate Constituency Rayat Kranti rebels with BJP)

कोल्हापूरचे प्राध्यापक एन डी चौगुले (N D Chaugule) यांना रयत क्रांती संघटनेकडून पुणे पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी उमेदवारी जाहीर केली. एन डी चौगुले आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यांनी उमेदवारी दाखल करण्याआधीच बंडाळी थोपवण्याचं आव्हान भाजपसमोर असेल.

दुसरीकडे, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे समर्थक प्रवीण घुगे यांनी औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून भाजपसोबत बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला. औरंगाबादमधून शिरीष बोराळकर यांना पक्षाने अधिकृतरित्या तिकीट दिले आहे. तर बीडचे माजी जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांनीही बंडाचे निशाण फडकवत अर्ज भरला. पोकळे यांनी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा पुतळा सोबत घेऊन उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर जयसिंगराव गायकवाड यांनीही बंडखोरी करत अर्ज भरला. मराठवाड्यातील तीन मोठ्या उमेदवारांनी बंडखोरी केल्याने भाजपला जबर हादरा बसल्याचे बोलले जाते.

रिंगणात कोण कोण ?

1. मराठवाडा औरंगाबाद पदवीधर

सतीश चव्हाण (राष्ट्रवादी)
शिरीष बोराळकर (भाजप)
प्रवीण घुगे (भाजप बंडखोर)
रमेश पोकळे (भाजप बंडखोर)
जयसिंगराव गायकवाड (भाजप बंडखोर)

2. पुणे पदवीधर

अरुण लाड (राष्ट्रवादी)
संग्रामसिंह देशमुख (भाजप)
प्रताप माने (राष्ट्रवादी बंडखोर)
रुपाली पाटील (मनसे)
शरद पाटील (जनता दल)
श्रीमंत कोकाटे (इतिहास संशोधक)
एन डी चौगुले (रयत क्रांती संघटना)

3. नागपूर पदवीधर

अभिजीत वंजारी (काँग्रेस )
संदीप जोशी (भाजप)
नितीन रोंघे ( विदर्भवादी)
राहुल वानखेडे (वंचित बहुजन आघाडी)

(Pune Graduate Constituency Rayat Kranti rebels with BJP)
4. अमरावती शिक्षक

श्रीकांत देशपांडे (शिवसेना)
नितीन धांडे (भाजप)
दिलीप निंभोरकर (शिक्षक भारती)
संगीता शिंदे (शिक्षण संघर्ष समिती) (भाजपचे माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांची बहीण )
प्रकाश काळबांडे (विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ )

5. पुणे शिक्षक संघ

जयंत आसगावकर (काँग्रेस )
उत्तम पवार (पदवीधर कल्याण मंडळ)

एक डिसेंबरला निवडणुकीसाठी मतदान

विधानपरिषदेवरील पाच पदवीधर शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. यामध्ये तीन जागा पदवीधर मतदारसंघ तर दोन जागा शिक्षक मतदारसंघाच्या आहेत. या पाच जागांसाठी एक डिसेंबरला मतदान होईल तर 3 डिसेंबरला निवडणुकांचे निकाल जाहीर होतील.

संबंधित बातम्या :

भाजपात डबल बंडखोरी, पंकजा समर्थकाचा उमेदवारी अर्ज, माजी जिल्हाध्यक्षाचाही बंडाचा झेंडा

 राष्ट्रवादीला बंडखोरीचं ग्रहण, अरुण लाड यांचं नाव जाहीर होताच प्रताप मानेंचा अर्ज

पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवरुन औरंगाबाद आणि नागपूरमध्ये आघाडीत बिघाडी? बंडखोरीची शक्यता

(Pune Graduate Constituency Rayat Kranti rebels with BJP)