Murlidhar Mohol Corona | पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाचा संसर्ग

| Updated on: Jul 04, 2020 | 7:49 PM

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना (Pune Mayor Murlidhar Mohol Tested Positive For COVID-19) कोरोनाची लागण झाली आहे.

Murlidhar Mohol Corona | पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाचा संसर्ग
Follow us on

पुणे : पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना (Pune Mayor Murlidhar Mohol Tested Positive For COVID-19) कोरोनाची लागण झाली आहे. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्वतः याबाबत ट्विट करत माहिती दिली. मुरलीधर मोहोळ यांना ताप आल्याने त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. मात्र, शनिवारी (4 जुलै) सायंकाळी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली (Pune Mayor Murlidhar Mohol Tested Positive For COVID-19).

आतापर्यंत महापौरांसह पाच नगरसेवकांना आणि एका उपायुक्तांना कोरोनाची बाधा झाली. चारही नगरसेवक कोरोना मुक्त झाले आहेत.

“थोडासा ताप आल्याने मी माझी #COVIDー19 टेस्ट केली असता, ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती स्थिर असून लवकरच बरा होऊन पुन्हा तुमच्या सेवेत असेल. उपचारादरम्यान सर्व यंत्रणांच्या संपर्कात राहून परिस्थितीचा आढावा घेत राहील”, असं ट्विट महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केलं आहे.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

मात्र, शहराचे प्रथम नागरिक या नात्याने महापौरांनी वेगवेगळ्या बैठकांना हजेरी लावली. शुक्रवारी (3 जुलै) पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत विभागीय आयुक्तालयात पार पडलेल्या बैठकीत ते हजर होते. या बैठकीत वेगवेगळ्या मागण्याही मांडल्या. त्याचबरोबर पालिका प्रशासन, नगरसेवक कार्यकर्ते ही त्यांच्या संपर्कात होते. त्यामुळे त्यांच्यामुळे महापौरांच्या संपर्कात आलेल्या अनेकांची पाचावर धारण बसली आहे. लॉकडाउनच्या काळात सातत्याने ते नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर होते.

पुणे महापालिकेत आतापर्यंत दोनशे जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी तब्बल 22 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर, 80 कर्मचारी रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर, 108 कर्मचाऱ्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Pune Mayor Murlidhar Mohol Tested Positive For COVID-19

राज्यातील मंत्री, आमदारांना कोरोनाची लागण

राज्यात यापूर्वी अनेक मंत्री आणि आमदारांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. सर्वात आधी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, मग सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि त्यानंतर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची बाधा झाली होती.

तिकडे नाशिकमधील राष्ट्रवादीच्या महिला आमदाराला कोरोनाची लागण झाली होती. तर नांदेडच्या एका आमदाराला कोरोना झाल्याचं निष्पण्ण झालं.

पुण्यातील भाजप आमदाराला कोरोनाची लागण झाली. पिंपरी चिंचवड महापालिकेअंतर्गत येणाऱ्या मतदारसंघातील आमदार कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. भाजप आमदार महेश लांडगे आणि त्यांच्या पत्नीला कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं आहे.

मिरा भाईंदरच्या आमदार गीता जैन यांना कोरोनाची लागण झाली. गीता जैन यांना त्यांच्या घरीच क्वारंटाईन करण्यात आलं आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील काँग्रेसच्या एका विद्यमान आमदारांना कोरोनाची लागण झाली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात तपासणीदरम्यान त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Pune Mayor Murlidhar Mohol Tested Positive For COVID-19

संबंधित बातम्या :

MLA corona | मिरा भाईंदरच्या आमदार गीता जैन यांना कोरोनाची लागण

Pimpari BJP MLA Corona | पिंपरीतील भाजप आमदाराला कोरोनाची लागण, पत्नीही पॉझिटिव्ह