Lockdown | पुण्यात अडकलेल्या मजुरांसाठी 36 विशेष रेल्वेगाड्या, 45 हजार प्रवासी रवाना

| Updated on: May 15, 2020 | 11:20 PM

लॉकडाऊनमुळे पुणे विभागात अडकलेल्या विविध राज्यातील 45 हजार 302 मजुरांना घरी पाठवण्यात आले (Special Train for Migrant Worker Pune) आहेत.

Lockdown | पुण्यात अडकलेल्या मजुरांसाठी 36 विशेष रेल्वेगाड्या, 45 हजार प्रवासी रवाना
Follow us on

पुणे : राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत (Special Train for Migrant Worker Pune) आहे. लॉकडाऊनमुळे पुणे विभागात अडकलेल्या विविध राज्यातील 45 हजार 302 मजुरांना घरी पाठवण्यात आले आहेत. यात मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, तामिळनाडू, राजस्थान आणि बिहार राज्यातील मजुरांचा समावेश आहे. या सर्व मजुरांना पुणे विभागातून 36 विशेष रेल्वेगाडया रवाना करण्यात आले आहे. पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी याबाबतची माहिती दिली.

पुणे विभागातून मध्यप्रदेशसाठी 14, उत्तरप्रदेशसाठी 14, उत्तराखंडसाठी 1, तामिळनाडूसाठी 1, राजस्थानसाठी 3 आणि बिहारसाठी 3 अशा एकूण 36 रेल्वेगाडया सोडण्यात आल्या. या सर्व गाड्यातून 45 हजार 302 प्रवाशी रवाना झाले.

तर उद्या 16 मे रोजी पुणे विभागातून उत्तरप्रदेशसाठी 2, राजस्थान आणि बिहारसाठी प्रत्येकी 1 अशा एकूण 4 रेल्वेगाडया नियोजित आहेत. यामध्ये एकूण 5 हजार 650 प्रवाशी संबंधित राज्यात रवाना होणार आहे.

यापैकी पुणे स्थानकावरुन उत्तरप्रदेश, राजस्थान आणि बिहारसाठी प्रत्येकी एक रेल्वे 1400 प्रवाशांसह नियोजित आहे. तर सातारा रेल्वे स्थानकावरुन उत्तर प्रदेशसाठी 1450 प्रवाशांसह एक रेल्वेगाडी नियोजित आहे.

या नागरिकांच्या प्रवासाच्या नियोजनाकरीता सबंधित जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा, संबंधित तहसील कार्यालय आणि रेल्वे विभागाच्या अधिकारी-कर्मचारी यांनी यामध्ये मोलाची भूमिका बजावत आहे, असे डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले. (Special Train for Migrant Worker Pune)

संबंधित बातम्या : 

मजूर चालून चालून थकले, भुकेने वाट रोखली, जळगावात उपासमारीने दोघांचा मृत्यू, एकाची पू्र्णा नदीत उडी

Lockdown Extension | मुंबईतील लॉकडाऊन लवकर उठणार नाही : राजेश टोपे