भारतीयांना कोरोना लस कधी मिळणार?, पीएम केअरचा निधी मोफत लसीकरणासाठी वापरणार का? राहुल गांधींचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना लसीबाबत देशाला उत्तरं दिलीच पाहिजेत, असं राहुल गांधी म्हणाले. ( Rahul Gandhi Narendra Modi)

भारतीयांना कोरोना लस कधी मिळणार?, पीएम केअरचा निधी मोफत लसीकरणासाठी वापरणार का? राहुल गांधींचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न
| Updated on: Nov 23, 2020 | 4:54 PM

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कोरोना लसीवरुन पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना लसीबाबत देशाला उत्तर दिली पाहिजेत, असं राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधींनी ट्विटद्वारे नरेंद्र मोदी यांना चार प्रश्न विचारले आहेत.  कोरोनावरील लस बनवणाऱ्या कोणत्या कंपनीची निवड केली गेलीय, पहिल्यांदा लस कोणाला मिळणार, कधी मिळणार, मोफत लस मिळणार, असे प्रश्न राहुल गांधींनी नरेंद्र मोदींना विचारले आहेत. (Rahul Gandhi  ask questions to Narendra Modi over corona vaccine)

राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांना भारत सरकरानं कोरोना लस बनवणाऱ्या सर्व कंपन्यांपैकी कोणत्या कंपनीची निवड केली आहे आणि का केली आहे? हा प्रश्न विचारला आहे.


कोरोना लस पहिल्यांदा कोणाला उपलब्ध होणार आणि कोरोना लस मिळाल्यानंतर त्याच्या वितरणाबाबत काय धोरण ठरवण्यात आले आहे? हा प्रश्नही राहुल गांधीनी विचारला आहे. (Rahul Gandhi  ask questions to Narendra Modi over corona vaccine)

मोफत कोरोना लस मिळणार का?

कोरोना काळात तयार केलेल्या पीएम केअरचा निधी सर्व भारतीयांना मोफत कोरोना लस देण्यासाठी वापर केला जाणार का? हा प्रश्न देखील राहुल गांधींनी उपस्थित केला आहे. सर्व भारतीयांना कोरोना लस कधीपर्यंत दिली जाणार आहे? हा प्रश्नदेखील राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारला.

राहुल गांधी सातत्याने ट्विटरवरुन मोदी सरकारला प्रश्न विचारत आहेत. मोदी सरकारनं अवेळी, नियोजन न करता केलेल्या लॉकडाऊनमुळं देशातली लाखो लोकांना गरिबीमध्ये ढकलले. विद्यार्थ्यांमध्ये डिजीटल दरी निर्माण झाली, असा आरोप राहुल गांधींनी नरेंद्र मोदी सरकारवर केला आहे.

दरम्यान,  पुणे येथील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून (SII) विकसित करण्यात येत असलेली ‘कोव्हिशिल्ड’ ही लस कोरोना संसर्ग रोखण्यासाठी 90 टक्के प्रभावी ठरत असल्याचं सांगण्यात येत आहे. तशी माहिती सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला (Adar Poonawalla) यांनी दिली आहे.

संबंधित बातम्या:

Corona vaccine | कोव्हिशिल्ड लस 90 टक्के प्रभावी; लवकरच वितरणाला सुरुवात, आदर पुनावाला यांची माहिती

काँग्रेसची निवडणूक ऐतिहासिक ठरणार; डिजीटलपद्धतीने होणार अध्यक्षाची निवड

(Rahul Gandhi  ask questions to Narendra Modi over corona vaccine)