
हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी निघालेले काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली

पोलिसांनी अडवल्यानंतर यमुना एक्सप्रेस वेवरुन पायी निघाले असताना राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले

पोलिसांच्या धक्काबुक्कीदरम्यान राहुल गांधी यांचा तोल गेल्याने ते जमिनीवर पडले. त्यांच्या हाताला मुका मार लागल्याची माहिती आहे

पोलिसांनी धक्काबुक्की केल्यानंतर तसंच राहुल गांधी यांची कॉलर पकडून ताब्यात घेतल्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळाले.

हाथरस पीडितेच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांची विचारपूस करण्यासाठी राहुल आणि प्रियांका गांधी निघाले होते