बळीराजाला समाधानकारक पावसाने दिलासा, राज्यात सरासरीच्या 112 टक्के पाऊस, कोणत्या विभागात किती?

| Updated on: Jul 03, 2020 | 8:36 AM

राज्य कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार 2 जुलैपर्यंत राज्यातील तब्बल 222 तालुक्यात सरासरीच्या 100 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाला

बळीराजाला समाधानकारक पावसाने दिलासा, राज्यात सरासरीच्या 112 टक्के पाऊस, कोणत्या विभागात किती?
Follow us on

नागपूर : ‘कोरोना’च्या संकट काळातही बळीराजाला समाधानकारक पावसामुळे चांगला दिलासा मिळाला आहे. यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत राज्यात सर्वदूर पुरेसा पाऊस पडल्याने, शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाला. राज्य कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार 2 जुलैपर्यंत राज्यातील तब्बल 222 तालुक्यात सरासरीच्या 100 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाला. (Rainfall in Maharshtra gives Relief to Farmer)

महाराष्ट्रात एकूण सरासरीच्या 112 टक्के पावसाची नोंद झाली आहे. तर राज्यातील 69 तालुक्यात सरासरीच्या 75 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाल्याने या भागात शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतिक्षा आहे.

नाशिक आणि औरंगाबाद विभागावर यंदा वरुणराजा चांगलाच मेहरबान आहे. या दोन्ही विभागात आतापर्यंत सरासरीच्या 150 टक्के पावसाची नोंद झाली आहे. तर अमरावती आणि पुणे विभागातही सरासरीच्या 100 टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला.

सुरुवातीच्या दिवसांतच पावसानं चांगली बॅटिंग केल्यामुळे, खरीप पिकांना मोठा आधार झाला असून, भूगर्भातील पाणी पातळी वाढण्यासही मोठी मदत होणार आहे. धरणांमध्ये पाणीसाठा वाढण्यासही पावसाचा चांगलाच फायदा झाला.

सरासरी पाऊसमान तालुक्यांची संख्या

100 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त – 222 तालुके

75 ते 100 टक्के पाऊस – 62 तालुके

50 ते 75 टक्के पाऊस – 50 तालुके

25 ते 50 टक्के पाऊस – 19 तालुके

फोटो : कृषी विभाग, महाराष्ट्र सरकार

(Rainfall in Maharshtra gives Relief to Farmer)

राज्यातील सहा विभागापैकी कुठल्या विभागात किती पाऊस पडला?

विभाग – पावसाची टक्केवारी

कोकण – 81.7 टक्के

नाशिक – 150.3 टक्के

पुणे – 101.2 टक्के

औरंगाबाद – 151.6 टक्के

अमरावती – 124.1 टक्के

नागपूर – 96 टक्के

राज्यात एकूण सरासरीच्या 112.6 टक्के पावसाची नोंद झाली

 

संबंधित बातमी :

पेरलं ते उगवलंच नाही! वर्ध्यात बोगस बियाणाने शेकडो एकरवरील सोयाबीन पेरणी बाद

(Rainfall in Maharshtra gives Relief to Farmer)