Wardha Farmers | पेरलं ते उगवलंच नाही! वर्ध्यात बोगस बियाणाने शेकडो एकरवरील सोयाबीन पेरणी बाद

एक-दोन नव्हे तर तब्बल 35 शेतकरी असे आहेत, ज्यांच्या शेतात जे पेरलं ते उगवलंच नाही.

Wardha Farmers | पेरलं ते उगवलंच नाही! वर्ध्यात बोगस बियाणाने शेकडो एकरवरील सोयाबीन पेरणी बाद
Follow us
| Updated on: Jun 24, 2020 | 6:47 PM

वर्धा : वर्ध्यात बोगस बियाण्याचा प्रकार समोर (Wardha Bogus Seeds Sowing) आला आहे. मांडगाव येथे हा प्रकार उघडकीस आला. 35 शेतकऱ्यांनी मांडगाव तसेच समुद्रपूर येथील कृषी सेवा केंद्रातून नामांकित कंपनीचे बियाणे खरेदी केले. पेरणीही आटोपली पण पेरुन 10 दिवस झाले, तरी अद्याप पेरलं ते उगवलंच (Wardha Bogus Seeds Sowing) नाही.

पाऊस आला, जमिनीतील ओल पाहूनच पेरणी केली. पण 10 दिवस लोटूनही अंकुर निघाले नसल्याने शेतकऱ्यांची झोपच उडाली आहे. सर्व शेतकरी संकटात सापडले आहेत. समुद्रपूर तालुक्यातील मांडगाव हे संपूर्ण शेतकऱ्याचं गाव आहे. काही शेतकऱ्यांनी गावातील कृषी सेवा केंद्रातून बियाण्याची खरेदी केली, तर काहींनी वर्धा शहरातील दुकानातून खरेदी केली. घरात असणारा कापूस विकला गेला नाही आणि यावर्षी मजूरही सापडणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन लागवडीवर भर दिला.

एक-दोन नव्हे तर तब्बल 35 शेतकरी असे आहेत, ज्यांच्या शेतात जे पेरलं ते उगवलंच नाही. एकाच शेतकऱ्याकडे 7 एकरच्यावर शेती आहे. 50 हजाराच्या घरात पेरणीवर खर्च करणाऱ्या शेतकऱ्यांवर आता पुन्हा दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे.

ईगल कंपनीच्या सोयाबीन बियाण्याची लागवड शेतकऱ्यांनी आपल्या शेतात केली आहे. सोबतच धरतीधन आणि रोहितच्या बियाण्याचे देखील लॉट निघाले नाही, अशी तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. मान्यता प्राप्त कंपनीचेच बियाणे मान्यता प्राप्त दुकानातून खरेदी केले तरीही दुबार पेरणीची वेळ आली आहे.

पेरलेले उगवलंच नाही, याची व्यथा घेऊन शेतकरी कृषी दुकानदारांकडे पोहचले पण कृषी दुकानदार आपली जबाबदारी ढकलत आहे. त्याचप्रमाणे कृषी कंपनी कमी पावसाचे तसेच, खोलवर पेरणी केली असल्याचे कारण सांगून शेतकऱ्यांची मुस्कटदाबी करत आहे. परंतु शेतात उखरुन बघितले, तर 50 टक्क्यांच्यावर दाणे सडलेल्या अवस्थेत आढळले आहेत (Wardha Bogus Seeds Sowing).

बाजूच्याच शेतात पेरणी यंत्राने दुसऱ्या कंपनीचे बियाणे पेरले असता ते बियाणे उगवले आहे. शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी केली आहे. तसेच, बोगस बियाणे पुरविणाऱ्या कंपनीवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

आधीच कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे कृषी कंपन्यांनी जादा दर आकारुन बियाणे विक्री केली आहे. त्यातच आता दुबार पेरणीसाठी कुठून बियाणे आणावे, तसेच भांडवल कसे उभे करावे, हा मोठा प्रश्न आहे. एकीकडे कोरोना छळतो आहे, तर दुसरीकडे कृषी बियाणे कंपणीची लबाडी समोर आली आहे. तक्रार केली तर कारवाई होणार की नाही अशीही शंका शेतकऱ्यांना आहे.

खिश्यात पैसे नसताना शेतकऱ्यांनी पैश्याची जुळवाजुळव केली. पावसाची साथही मिळाली, पण बोगस बियाण्यांनी शेतकऱ्याच चांगलंच कंबरडे मोडलं आहे.

Wardha Bogus Seeds Sowing

संबंधित बातम्या :

सरकारकडून येणे लिहा, पण शेतकऱ्यांना पीककर्ज द्या, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

Bhendwal Bhavishyavani : पाऊस भरपूर पण पीक साधारण, राजा कायम पण ताण वाढेल, भेंडवळची भविष्यवाणी

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.