कॅन्सरने मुलगा हिरवला, पत्नीचं सोनं विकून पेरणी, बैलाऐवजी स्वत:ला जुंपून मशागत

बियाणे आणि खते एवढीच खरेदी गहाण दागिन्यांतून झाल्यावर, काकरे फाडण्याच्या कामात मात्र बैलांऐवजी स्वतःलाच जुंपलं. (Wardha farmer)

कॅन्सरने मुलगा हिरवला, पत्नीचं सोनं विकून पेरणी, बैलाऐवजी स्वत:ला जुंपून मशागत
Follow us
| Updated on: Jun 20, 2020 | 12:08 PM

वर्धा : शेतकऱ्यांच्या पीक कर्जाच्या अडचणी अद्याप सुटल्या नाहीत. ऐन खरिपाचा हंगाम असताना हाताशी पैसा नाही. जो होता तोही आपल्या कॅन्सरग्रस्त मुलाचा जीव वाचविण्यात घालविला, पण पैसे जीव वाचवू शकले नाही. आता करावं काय? अशा पेचात असणाऱ्या शेतकऱ्याने पत्नीचे दागिने गहाण ठेऊन पेरणी आटोपली. बियाणे आणि खते एवढीच खरेदी गहाण दागिन्यांतून झाल्यावर, काकरे फाडण्याच्या कामात मात्र बैलांऐवजी स्वतःलाच जुंपलं. (Wardha farmer)

जिल्ह्यातील नारा येथील रमेश बनसोड यांच्याकडे अडीच एकर शेती आहे. त्यावर सन 2008 मध्ये पीककर्ज घेतलं, तेव्हापासून परिस्थिती नसल्याने कर्ज फेडू शकले नाहीत. सरकारने कर्जमाफी केली मात्र त्या कर्जमाफीमध्ये आमची कर्जमाफी झाली नाही त्यामुळे पुन्हा शेतीवर कर्ज मिळालं नाही, अशी आपबिती शेतकरी रमेश यांनी मांडली.

शेतात पेरणी करण्यासाठी पैसे नसल्याने रमेश यांनी त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील पोत, कानातले सोन्याचे दागिने गहाण ठेवले. त्यातून फक्त शेतीसाठी बियाणे आणि खतं घेण्यात आली. शेतीत लागवड करण्यासाठी बैलजोडीची गरज असते, मात्र त्याचं भाडे देणे होत नसल्याने शेतकरी रमेश यांनी स्वतः काकरी बनवली आणि दिवसभर बैलासारखी ओढून कपाशी लागवडीसाठी शेतात काकर फाडले. त्यानंतर पत्नी ,पुतणे शेतीच्या कपाशी लागवड करण्यासाठी मदत करु लागले. यातून पैसा खर्च होत नाही मात्र बियाणे आणि खत यावर पैसे खर्च केला आहे.

“अचानक माझ्या मुलाला ब्लड कॅन्सरच्या दुर्धर आजाराने ग्रासले होते. तेवढे पैसे त्याच्या आजाराला लावावे लागले. अनेकांनी आर्थिक मदत केली मात्र अक्षयने अखेर जगाचा निरोप घेतला. त्याच्या आजारासाठी अनेकांकडून कर्ज घेतले,आता खरीप हंगामाला सुरुवात झाली, शेती पेरणी करायची कशी हा प्रश्न सतावत असताना, पत्नीच्या गळ्यातील पोत. कानातले दागिने गहाण ठेवले. आता त्यातून मिळालेल्या पैशात शेती करत आहे.

(Wardha farmer)

संबंधित बातम्या 

केंद्रीय कॅबिनेटची महत्त्वाची बैठक, शेतकरी आणि मजुरांसह इतर घटकांसाठी मोठ्या घोषणा  

PM Modi | अर्थव्यवस्था पुन्हा उभी करणार, देशातील शेतकरी-उद्योजकांवर माझा विश्वास : पंतप्रधान मोदी 

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.