AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हे एक कटू सत्य…; लग्न मोडल्यानंतर स्मृती मानधना पहिल्यांदाच मनमोकळेपणाने बोलली

भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार क्रिकेटपटू स्मृती मानधना सतत चर्चेत आहे. नुकताच स्मृती मानधनाने सोशल मीडियाच्या माध्यमातून लग्न मोडल्यानंतर पहिल्यांदाच मनमोकळेपणाने भावना व्यक्त केल्या आहेत. ती नेमकं काय म्हणाली वाचा...

हे एक कटू सत्य...; लग्न मोडल्यानंतर स्मृती मानधना पहिल्यांदाच मनमोकळेपणाने बोलली
Smriti MandhanaImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Feb 22, 2026 | 12:53 PM
Share

भारतीय महिला क्रिकेट संघातील स्टार क्रिकेटपटू स्मृती मानधना गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. स्मृतीचे संगीत दिग्दर्शक पलाश मुच्छलसोबत लग्न होणार होते. पण शेवटच्या क्षणी हे लग्न मोडले आहे. आता टीम इंडियाची स्टार महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात तिने ८२ धावांची जबरदस्त खेळी करत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. सामना संपल्यानंतर आता स्मृतीने आपल्या खेळाबद्दल आणि वैयक्तिक आयुष्याबाबत खुलासा केला आहे. या वेळी ती भावुक झाल्याचे दिसून आले. तिची इंस्टाग्राम स्टोरी सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे.

इंस्टाग्राम स्टोरीत स्मृतीने काय लिहिले?

स्मृतीने आपल्या स्टोरीत खेळाच्या कठोर वास्तवाबद्दल लिहिले आहे. “खेळ कधीच तुमच्या भावनांची कदर करत नाही. हे एक कटू सत्य आहे. तो तुम्ही थकलेला आहात की नाही याची पर्वा करत नाही. तुम्ही थकलेले असाल, नुकतेच जिंकले असाल, सर्वोत्तम खेळाडू असाल किंवा अगदी नवखे असाल तरीही… खेळाला यापैकी कशाचीच फिकीर नसते. तुम्ही किती आत्मविश्वासात आहात किंवा किती नर्वस आहात, यानेही काही फरक पडत नाही,” असे तिने लिहिले आहे.

Smriti Post

तिने पुढे म्हटले, “खेळाला फक्त एकाच गोष्टीशी देणंघेणं असतं – ती म्हणजे तुम्ही मैदानावर तो सामना कसा खेळता. त्या दिवशी सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी तुम्ही कोणत्या जिद्दीने उतरता, हेच सर्वांत महत्त्वाचे ठरते. जर तुम्ही खेळाला पूर्ण आदर देऊन तुमचे सर्वस्व अर्पण केले, तरच यशाची संधी मिळू शकते. ही प्रक्रिया पुन्हा पुन्हा अनुभवण्याची मिळणारी संधी ही खरोखरच अप्रतिम आहे. मला वाटतं ही एक भयानक (अद्भुत) भावना आहे.”

वेदनेतून कमबॅक

गेल्या काही महिन्यांपासून स्मृती मानधना वैयक्तिक स्तरावर खूप कठीण काळातून गेली आहे. संगीतकार पलाश मुच्छल यांच्याशी झालेल्या लग्नाच्या नात्यातील ब्रेकअपनंतर तिला मोठा धक्का बसला होता. त्यानंतर काही काळ ती सर्वांपासून दूर राहिली होती. मात्र, तिने हार मानली नाही. पुन्हा मैदानावर पाऊल ठेवले, सराव सुरू केला आणि महिला प्रीमियर लीगमध्येही ट्रॉफी जिंकली. आता ती पुन्हा आपल्या फॉर्ममध्ये परतली आहे आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातील तिची खेळी याचा पुरावा आहे.

Follow Us
आशा भोसले यांना अशोक सराफ यांनी वाहिली आदरांजली, म्हणाले त्यांचा आवाज
आशा भोसले यांना अशोक सराफ यांनी वाहिली आदरांजली, म्हणाले त्यांचा आवाज.
सुरांचा अमर आवाज हरपला... आशा भोसलेंच्या निधनावर देवेंद्र फडणवीसांचं भ
सुरांचा अमर आवाज हरपला... आशा भोसलेंच्या निधनावर देवेंद्र फडणवीसांचं भ.
संगीत क्षेत्रातला जादूई स्वर हरपला! ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निध
संगीत क्षेत्रातला जादूई स्वर हरपला! ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निध.
संजय राऊतांनी केले पाकिस्तानचे कौतुक, नेमकं काय म्हणाले? पाहा
संजय राऊतांनी केले पाकिस्तानचे कौतुक, नेमकं काय म्हणाले? पाहा.
मुंबईसह उपनगरात CNG च्या किमती वधारल्या, किती रुपयांवर पोहोचले दर?
मुंबईसह उपनगरात CNG च्या किमती वधारल्या, किती रुपयांवर पोहोचले दर?.
नाशिकमध्ये महिलांशी गैरवर्तन करणाऱ्या संशयितांचे मोबाईल जप्त, सापडलेल्
नाशिकमध्ये महिलांशी गैरवर्तन करणाऱ्या संशयितांचे मोबाईल जप्त, सापडलेल्.
'विभागत महिला नको म्हणून डावललं' मनिषा म्हैसरांचा महायुतीतील मंत्र्याव
'विभागत महिला नको म्हणून डावललं' मनिषा म्हैसरांचा महायुतीतील मंत्र्याव.
इराण- अमेरिकेचं आणखी बिनसलं? इस्लामाबादमधील भेटीत नेमकं काय -काय घडलं?
इराण- अमेरिकेचं आणखी बिनसलं? इस्लामाबादमधील भेटीत नेमकं काय -काय घडलं?.
भारताकडून इराणला मदतीचा हात, वैद्यकीय साहित्याची दुसरी खेप रवाना
भारताकडून इराणला मदतीचा हात, वैद्यकीय साहित्याची दुसरी खेप रवाना.
वारकरी संप्रदायाने बहुजन समाजाला धार्मिक अधिकार दिला - हर्षवर्धन सपकाळ
वारकरी संप्रदायाने बहुजन समाजाला धार्मिक अधिकार दिला - हर्षवर्धन सपकाळ.