‘ती’ फाईल सोमवारी मिळाली, फाईल राज्यपालांच्या विचाराधीन, राजभवनचं स्पष्टीकरण

| Updated on: Aug 03, 2021 | 7:33 PM

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) सदस्य नियुक्तीवरू सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलाच वाद रंगला आहे. त्यात एमपीएससीच्या सदस्य नियुक्तीची फाईल राज्यपालांकडे (Bhagatsingh Koshyari) पाठवली असल्याची माहिती समोर आली होती. यावर राजभवनाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यांच्या नियुक्तीसंदर्भात शिफारस असलेली फाईल सोमवारी म्हणजेच 2 ऑगस्टला दुपारनंतर राजभवन येथे प्राप्त झाली असल्याचं राज्यपाल […]

ती फाईल सोमवारी मिळाली, फाईल राज्यपालांच्या विचाराधीन, राजभवनचं स्पष्टीकरण
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
Follow us on

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) सदस्य नियुक्तीवरू सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलाच वाद रंगला आहे. त्यात एमपीएससीच्या सदस्य नियुक्तीची फाईल राज्यपालांकडे (Bhagatsingh Koshyari) पाठवली असल्याची माहिती समोर आली होती. यावर राजभवनाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यांच्या नियुक्तीसंदर्भात शिफारस असलेली फाईल सोमवारी म्हणजेच 2 ऑगस्टला दुपारनंतर राजभवन येथे प्राप्त झाली असल्याचं राज्यपाल कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे. हा प्रस्ताव राज्यपालांच्या विचाराधीन आहे असंही राजभवनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. (Raj Bhavan’s explanation that the Governor received the file of appointment of members of MPSC Commission on Monday)

उपमुख्यमंत्री अजित पवारांचं अश्वासन

एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊनही नियुक्ती न मिळाल्यानं पुण्यातल्या स्वप्निल लोणकर या तरूणाने आत्महत्या केली होती. त्यानंतर एमपीएसी विद्यार्थ्यांसोबतच विरोधकांनीही सरकारला चांगलंच धारेवर धरलं. 31 जुलैपर्यंत एमपीएससीच्या रिक्त जागा भरू असं अश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विधानसभेत दिलं होतं. मात्र, 31 जुलैचा दिवस उलटून गेला तरी अद्याप उत्तीर्ण झालेल्यांना नियुक्त्या मिळालेल्या नाहीत.

रोहीत पवारांचा राज्यपालांना टोला

एमपीएससी आयोगासाठी तीन सदस्यांची नावं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी 31 जुलैपूर्वी राज्यपालांकडे पाठवली असल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे सदस्य नियुक्तीचा चेंडू राज्यपालांच्या कोर्टात असल्याचं समोर आलं होतं. यावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहीत पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना टोलाही लगावला होता.

राजभवनाचं स्पष्टीकरण

एमपीएससी आयोगाच्या सदस्य नियुक्तीचा विषय राज्यपालांमुळे लांबणीवर जात असल्याचं चित्र निर्माण होताच राजभवनाकडून त्याबाबत तात्काळ स्पष्टीकरण देण्यात आलं. सदस्य नियुक्तीची फाईल ही 31 जुलैपूर्वी नाही तर सोमवारी दुपारनंतर राजभवन कार्यालयाला मिळाली असल्याचं राजभवनकडून सांगण्यात आलं आहे. शिवाय हा प्रस्तावावर राज्यपाल विचार करत आहेत असंही राजभवनकडून सांगण्यात आलं आहे.