राज्यात दोन वेगळी सत्ताकेंद्र निर्माण करण्याचं काम राज्यपालांकडून सुरु, नवाब मलिकांचा गंभीर आरोप

राज्यपाल कोश्यारी यांचा 5 तारखेला नांदेड दौरा नियोजित आहे. या दौऱ्यात ते राज्य सरकारनं केलेल्या कामांचं उद्धाटन करणार आहे, हे गैर आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

राज्यात दोन वेगळी सत्ताकेंद्र निर्माण करण्याचं काम राज्यपालांकडून सुरु, नवाब मलिकांचा गंभीर आरोप
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक


मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील संघर्ष काही थांबण्याची चिन्ह दिसत नाहीत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्हा दौऱ्यातील कार्यक्रमांविर तीव्र आक्षेप घेतलाय. राज्यपाल कोश्यारी यांचा 5 तारखेला नांदेड दौरा नियोजित आहे. या दौऱ्यात ते राज्य सरकारनं केलेल्या कामांचं उद्धाटन करणार आहे, हे गैर आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. याबाबत राज्याचे मुख्य सचिव राज्यपालांच्या सचिवांशी चर्चा करुन हा कार्यक्रमात बदल करतील अशी अपेक्षा अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केलीय. (State Government’s Objection to Governor’s Visit to Nanded, Hingoli, Parbhani)

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा 5 ऑगस्ट रोजी नांदेड दौरा होणार आहे. या दौऱ्यात नांदेडमध्ये स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठातील दोन वसतीगृहांचं उद्घाटन करणार आहेत. मात्र, ही वसतीगृह राज्य सरकारच्या अल्पसंख्याक विकास विभागाकडून बांधण्यात आली आहेत. हॉस्टेल बांधण्यासाठी निधी राज्य सरकारने दिला आहे. त्यांनी ही वसतीगृह विद्यापीठाला अद्याप वर्ग करण्यात आलेली नाहीत. मात्र, राज्यपाल कोश्यारी राज्य सरकारला न कळवता या वसतीगृहांचं उद्घाटन करणार आहेत. तसंच ते जिल्हाधिकारी आणि प्रशासनातील अन्य अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत आहेत. हिंगोली आणि परभणीमध्येही ते जिल्हाधिकारी आणि प्रशासनातील अन्य अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेणार आहेत, है गैर असल्याचं मदत मलिक यांनी व्यक्त केलंय.

‘राज्यपालांच्या दौऱ्यात राज्य सरकारच्या अधिकारांवर गदा’

आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यपालांच्या या दौऱ्याबाबत चर्चा झालीय. विद्यापीठातील कार्यक्रमावर आक्षेप नाही. मात्र, उद्घाटन आणि प्रशासनासोबतच्या बैठकींवर राज्य मंत्रीमंडळात नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. या बैठका म्हणजे राज्यात दोन वेगळी सत्ताकेंद्र निर्माण करण्याचं काम केलं जात असल्याचा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केलाय. तसंच राज्याच्या मुख्य सचिवांना राज्यपालांच्या सचिवांना याबाबत अवगत करण्यास सांगितलं आहे. त्यानुसार राज्याचे मुख्य सचिव राज्यपालांच्या सचिवांची भेट घेतील. राज्यपालांच्या दौऱ्यात राज्य सरकारच्या अधिकारांवर गदा आणली जात असल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी केलाय.

संबंधित बातम्या :

तर घरोघरी जाऊन ओबीसींचा इम्पिरीकल डाटा गोळा करावा लागेल: विजय वडेट्टीवार

पवार-शाहांची भेट राजकीय नाही, सहकार विषयावर चर्चेची शक्यता, प्रवीण दरेकरांचा दावा

State Government’s Objection to Governor’s Visit to Nanded, Hingoli, Parbhani

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI