भगतसिंह कोश्यारी तळीयेला भेट देणार, उद्धव ठाकरे,नारायण राणेंपाठोपाठ राज्यपाल ग्रामस्थांची विचारपूस करणार

आता महाराष्ट्राचे राज्यपाल मंगळवारी तळीयेला जाणार आहेत. तळीयेमध्ये राज्यपाल भेट देऊन घटनास्थलाची पाहणी करतील.

भगतसिंह कोश्यारी तळीयेला भेट देणार, उद्धव ठाकरे,नारायण राणेंपाठोपाठ राज्यपाल ग्रामस्थांची विचारपूस करणार
Governor Bhagat Singh Koshyari

मुंबई: रायगडच्या महाड तालुक्यातील पाच दिवसापूर्वी तळीये येथे डोंगराचा कडा कोसळून झालेल्या दुर्घटनेत 35 घरे जमीनदोस्त झाली होती. या दरडीखाली दबलेले 32 मृतदेह काढण्यात बचाव पथकाला यश आलं होतं. मात्र, त्यानंतर एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि टीडीआरएफच्या टीमने रेस्क्यू ऑपरेशन हाती घेऊन कालपर्यंत 53 मृतदेह बाहेर काढले. मात्र, अजूनही 32 नागरिक बेपत्ता आहेत. ग्रामस्थांनी बेपत्ता व्यक्तींना मृत घोषित करण्याची मागणी केली आहे. तर, तळीये ग्रामस्थांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री नारायण राणे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर यांनी तळीयेला भेट दिली होती. आता महाराष्ट्राचे राज्यपाल मंगळवारी तळीयेला जाणार आहेत. तळीयेमध्ये राज्यपाल भेट देऊन घटनास्थलाची पाहणी करतील.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा दौरा कसा असेल?

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी उद्या मंगळवार 27 जुलै 2021 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. मंगळवार 27 जुलै 2021 रोजी सकाळी 9.30 वा. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई येथून महाड जि. रायगड कडे प्रयाण. सकाळी 10.20 वा. महाड एमआयडीसी हेलिपॅड येथे आगमन. सकाळी 10.25 वा. पिडिलाइट विश्रामगृह येथे राखीव. सकाळी 10.35 वा. पिडिलाइट विश्रामगृह येथून तळीये ता. महाड कडे प्रयाण. सकाळी 11.00 वा. तळीये, ता.महाड येथे आगमन व दरडग्रस्त भागाची पाहणी. सकाळी 11.45 वा. तळीये ता. महाड जि. रायगड येथून पिडिलाइट विश्रामगृहाकडे प्रयाण. दुपारी 12.10 वा. पिडिलाइट विश्रामगृह येथे आगमन व राखीव. दुपारी 12.20 वा. पिडिलाइट विश्रामगृह येथून महाड एमआयडीसी हेलिपॅड कडे प्रयाण. दुपारी 12.25 वा. महाड एमआयडीसी हेलिपॅड येथे राखीव. दुपारी 12:30 वाजता महाड एमआयडीसी हेलिपॅड येथून गुहागर जि.रत्नागिरी कडे प्रयाण करतील.

तळीयेतील 32 नागरिक बेपत्ता

पाच दिवसापूर्वी तळीये येथे डोंगराचा कडा कोसळून झालेल्या दुर्घटनेत 35 घरे जमीनदोस्त झाली होती. या दरडीखाली दबलेले 32 मृतदेह काढण्यात बचाव पथकाला यश आलं होतं. मात्र, त्यानंतर एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि टीडीआरएफच्या टीमने रेस्क्यू ऑपरेशन हाती घेऊन कालपर्यंत 53 मृतदेह बाहेर काढले. मात्र, अजूनही 32 नागरिक बेपत्ता आहेत.

बेपत्ता नागरिकांना मृत घोषित करण्याची मागणी

गेल्या पाच दिवसांपासून तळीये येथे दरडीचा ढिगारा उपसण्याचं आणि बेपत्ता नागरिकांना शोधण्याचं काम सुरू होतं. त्यासाठी या ठिकाणी एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि टीडीआरएफची पथकं गेल्या पाच दिवसापासून रेस्क्यू ऑपरेशन करत होती. आजही या पथकांनी घटनास्थळी येऊन रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं. मात्र, त्यानंतर दोन तासाने रेस्क्यू मृतांना श्रद्धांजली अर्पण करुन रेक्स्यू ऑपरेशन थांबवण्यात आलं. या पथकांनी रेस्क्यू ऑपरेशन थांबवल्यानंतर स्थानिकांनी त्यांना गराडा घातला. तुम्ही रेस्क्यू ऑपरेशन थांबवा. त्याबद्दल आमचा आक्षेप नाही. मात्र, जे लोक बेपत्ता आहेत. त्यांना मृत घोषित करा, अशी मागणी या नागरिकांनी केली.

इतर बातम्या:

नारायण राणेंच्या अधिकाऱ्यांवरील संतापावर अजितदादांचा उतारा, मंत्र्यांच्या दौऱ्यासोबत ‘हा’ अधिकारी ठेवण्याचा निर्णय

फडणवीस म्हणाले, ताई, मी तुम्हाला दीर्घायुष्य चिंतितो, पंकजा मुंडे म्हणाल्या थँक्यू देवेनजी! राज्यात चर्चेत असलेले दोन ट्विट

Maharashtra Governor Bhagatsingh Koshyari will visit Taliye village in Raigad district

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI