नारायण राणेंच्या अधिकाऱ्यांवरील संतापावर अजितदादांचा उतारा, मंत्र्यांच्या दौऱ्यासोबत ‘हा’ अधिकारी ठेवण्याचा निर्णय

सध्या कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रावर जे संकट कोसळलंय त्यांना जनतेने फूल ना फुलाची पाकळी म्हणून मदत करावी,असं आवाहन अजित पवार यांनी केलं आहे.

नारायण राणेंच्या अधिकाऱ्यांवरील संतापावर अजितदादांचा उतारा, मंत्र्यांच्या दौऱ्यासोबत 'हा' अधिकारी ठेवण्याचा निर्णय
अजित पवार नारायण राणे
Follow us
| Updated on: Jul 26, 2021 | 10:59 PM

सांगली: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगलीतील पूरग्रस्त भागाची पाहणी केली. पूरग्रस्त जनतेशी संवाद साधल्यानंत अजित पवार सांगलीत पत्रकार परिषद घेतली. अजित पवार यांनी सांगलीत बोलताना आता बरेच जण दौरे करत आहेत, केंद्र सरकारचे मंत्री येत आहेत.तो त्यांचा अधिकार आहे. आम्ही आता नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करणार आहोत. नोडल अधिकारी मंत्र्यांच्या दौऱ्यासोबत असतील, अशी माहिती दिली. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, मनपा आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी हे दालनात बसूनच आता मदती संदर्भात काम करतील, असं अजित पवार म्हणाले. अधिकाऱ्यांना हे कुठे ते कुठे चालणार नाही, अधिकाऱ्यांना सुद्धा मदतीसाठी वेळ हवा आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यांच्या दौऱ्यात जिल्हाधिकारी आणि इतर अधिकारी उपस्थित नसल्यानं संताप व्यक्त केला होता.

नारायण राणे कायं म्हणाले होते?

नारायण राणे जिल्हाधिकाऱ्यांना म्हणाले, “तो सीएम बीएम गेला उडत. आम्हाला कुणाचीही नावं सांगू नका. प्रांत सांगतो पालकमंत्र्यांसोबत आहे, तुम्ही सांगताय सीएमसोबत आहे. इथं कोण आहे? इथं तुमचा एक तरी अधिकारी आहे का? आतापर्यंत तुम्हाला स्वस्थ बसू दिलं, आता जागेवर बसू देणार नाही हे लक्षात ठेवा.” समोर जिल्हाधिकाऱ्यांनी सीईओ संबंधित ठिकाणी असल्याचं सांगितलं. त्यानंतर कोण सीईओ आहे, मला कुणीही भेटलं नाही असं सांगितलं. मी बाजारपेठेत उभा आहे. कोण आहेत सीईओ? मला दाखवा, असंही नारायण राणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सुनावलं होतं.

राष्ट्रावादीच्या खासदार आमदारांचा एका महिन्याचा पगार पूरग्रस्तांना

सध्याच्या संकटात राज्य सरकार, केंद्र सरकार मदत करत आहे, राष्ट्रवादीचे सर्व आमदार,खासदार, मंत्री यांचं एक महिन्याचं मानधन देणार आहे. जलसंपदा मंत्री आणि प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी हा निर्णय घेतल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. महाराष्ट्रातील जनता नैसर्गिक संकटाच्या काळात मदतीचा हात पुढे करत असते. जनतेने फूल ना फुलांची पाकळी म्हणून मदत करावी. सध्या कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रावर जे संकट कोसळलंय त्यांना जनतेने फूल ना फुलाची पाकळी म्हणून मदत करावी,असं आवाहन अजित पवार यांनी केलं आहे.

इतर बातम्या:

Video: सीएम बीएम गेला उडत, आम्हाला नावं नका सांगू कुणाची? राणे जिल्हाधिकाऱ्यावर संतापले

Maharashtra Flood : केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील टीकेला गुलाबराव पाटलांचं जोरदार प्रत्युत्तर

Ajit Pawar said govt will appoint Nodal Officer who will present at the time of Ministers to visit flood affected area

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.