AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Flood : केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील टीकेला गुलाबराव पाटलांचं जोरदार प्रत्युत्तर

नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक टीका केली होती. राणे यांच्या टीकेला शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

Maharashtra Flood : केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील टीकेला गुलाबराव पाटलांचं जोरदार प्रत्युत्तर
गुलाबराव पाटील, नारायण राणे
| Edited By: sagar joshi | Updated on: Jul 26, 2021 | 8:36 PM
Share

जळगाव : मुसळधार पाऊस, महापूर आणि दरड कोसळून झालेल्या दुर्घटनांमध्ये कोकणातील चिपळूण, खेड, महाड तालुक्यात कधीही न भरुन येणारं नुकसान झालं आहे. याच नुकसानाची पाहणी करण्यासाठी नेतेमंडळींचे दौरे सुरु आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही चिपळूणमधील पूरस्थिती आणि झालेल्या नुकसानाची पाहणी केली. त्यावेळी बोलताना नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक टीका केली होती. राणे यांच्या टीकेला शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. (Gulabrao Patil’s reply to Narayan Rane’s criticism of CM Uddhav Thackeray)

राज्‍यावर मोठे संकट आहे. अशात राजकारण करायला नको. राज्‍यावर आलेल्‍या संकटाबाबत नारायण राणे यांनी मुख्‍यमंत्री हे पांढऱ्या पायाचे असल्‍याने राज्‍यावर संकट आल्‍याचे वक्‍तव्‍य केलं. मात्र, राणे हे केंद्रीय मंत्री झाले आणि कोकणावर संकट आलं. म्‍हणजे राणेच पांढऱ्या पायाचे आहेत, अशी टीका गुलाबराव पाटील यांनी केलीय. ते जळगावात बोलत होते. संकटात सापडलेल्या व्‍यक्‍तीला सर्वतोपरी मदत करायला हवी. माणसाने माणसाला मदत करण्यासाठी एकत्र यायला हवं. राजकारण करायला खुप आखाडे आहेत. जेव्‍हा वेळ असते तेव्‍हा तुमचा झेंडा घेवून तुम्‍ही उतरा, आमचा झेंडा घेवून आम्‍ही आखाड्यात उतरु. मात्र, राज्‍य संकटात असताना राजकारण करणे योग्‍य नसल्‍याचंही गुलाबराव पाटील म्हणाले.

नारायण राणे काय म्हणाले होते?

केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी रविवारी तळीयेमध्ये येऊन दुर्घटनेची पाहणी केली. यावेळी त्यांनी दुर्घटनाग्रस्तांची विचारपूस करून त्यांचे सांत्वन केले. तसेच अधिकाऱ्यांकडून घटनेची माहिती घेतली. ही घटना घडल्यानंतर राज्य सरकारशी तुमचं काही बोलणं झालं का? असा सवाल राणेंना यावेळी करण्यात आला. त्यावर उत्तर देताना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर त्यांचं नाव न घेता टीका केली. कुठलं सरकार? महाराष्ट्र सरकारचे लोकं भेटत नाहीत, बोलत नाहीत. आता कुठे डिस्चार्ज झालाय घरातून आता फिरत आहेत, अशी टीका राणे यांनी केली.

आरोप करणं योग्य नाही

कोकणात वारंवार पूरस्थिती होती. त्यामुळे या ठिकाणी कायमस्वरुपी एनडीआरएफची तुकडी ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल, असं ते म्हणाले. या घटनेची कुणालाही कल्पना नव्हती. असं काही घडेल असं वाटलं नव्हतं. डोंगराची माती खाली येईल किंवा डोंगराचा कडा कोसळेल असं कुणाला वाटलं नव्हतं. त्यामुळे या घटनेवरून कुणावर आरोप करणं योग्य नाही. आज या दुर्घटनाग्रस्तांचं पुनर्वसन करणं महत्त्वाचं आहे, असंही राणे म्हणाले.

संबंधित बातम्या :

Taliye Landslide : तुमचं दु:ख आम्ही जाणतो, उद्ध्वस्त तळीयेसाठी माळीणवासियांकडून मोठी मदत

केवळ डोकं बाहेर, सगळं अंग चिखलात रुतून, 24 तास धडपड, दरडीला गाढणाऱ्या आजीचा थरार

Gulabrao Patil’s reply to Narayan Rane’s criticism of CM Uddhav Thackeray

Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा