AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik : 18 तास बॉडी घरातच ठेवली, त्यानंतर कसारा घाटात फेकली, बॉयफ्रेंडचा भयानक अंत, पोलिसांनी कसा लावला प्रकरणाचा छडा!

Nashik : लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होत असलेल्या त्रासाला कंटाळून महिलेने 40 वर्षीय बॉयफ्रेंडचा मित्राच्या मदतीने काटा काढला. त्यांनी बॉडी 18 तास घरातच ठेवली आणि त्यानंतर कसारा घाटात फेकली.. याप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत संशयितांना ताब्यात घेतलं आहे.

Nashik : 18 तास बॉडी घरातच ठेवली, त्यानंतर कसारा घाटात फेकली, बॉयफ्रेंडचा भयानक अंत, पोलिसांनी कसा लावला प्रकरणाचा छडा!
Nashik Crime
| Updated on: Aug 18, 2026 | 10:18 AM
Share

Nashik : नाशिक येथून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या बॉयफ्रेंडची, गर्लफ्रेंडने मित्राच्या मदतीने हत्या केली आहे. ही भयानक घटना समोर आल्यानंतर सर्वत्र खळबळ उजाली आाहे. मिळालेल्या माहितीनुसार, गर्लफ्रेंडने मित्राच्या मदतीने घरातच बॉयफ्रेंडची गळा चिरुन हत्या केली. वसंत गोरखनाथ सातपुते असं चाळीस वर्षीय मृत व्यक्तीचे नाव आहे. संशयितांनी सातपुते यांची हत्या केल्यानंतर मृतदेह तब्बल 18 तास घरातच ठेवला. त्यानंतर कारमधून घेऊन जात असताना कसारा घाटात फेकला…

मन सुन्न करणारी गोष्ट म्हणजे, सातपुते यांचा मृतदेह फेकल्यानंतर संशयित व्यक्ती मुंबईत फिरले आणि त्यांनी रक्ताचे डाग देखील पुसले. याप्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झालेला नसताना, पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारावर गुन्हा उघडकीस आणला. मिळालेल्या माहितीनुसार, संशयित हसिना शेख, तिचा मित्र साहिल शहा आणि साथीदारांनी कारमधून मृतदेह नेल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती.

त्यानंतर पोलिसांनी मोठी कारवाई केली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी कसारा घाटात शोध घेतला. त्यानंतर मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचं काम पोलिसांनी सुरू केलं असता तो वसंत गोरखनाथ सातपुते असल्याचे स्पष्ट झालं. पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर हसिना शेख आणि मित्र साहिल शहा दोघांना अटक करण्यात आली आहे.

समोर येत असलेल्या माहितीनुसार, मृत सातपुते सतत हसिना यांचे पैसे चोरायचा आणि मद्यपान देखील करायचा. एवढंच नाही तर, त्याला जुगाराचं देखील व्यसन असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहेय. याच कारणामुळे दोघांमध्ये सतत वाद व्हायचे… सातपुते मारहाण शिवीगाळही करत असल्याने हसीना त्रस्त झाली होती, त्यामुळे मित्राच्या मदतीने सातपुतेचा काटा काढल्याचं सांगितलं जात आहे. सध्या याप्रकरणी पोलीस अधिक चौकशी करत आहेत.

याप्रकरणी पोलिसांनी हसीना शेख, साहिल शहा आणि मोईन शहा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस आता संशयितांनी नेमकी हत्या कशी केली, हत्या का केली आणि यामध्ये किती जणांचा सहभाग आहे… अशा सर्व पैलूंची चौकशी करत आहेत.

Follow Us
उदय सामंत: 'एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य'
उदय सामंत: एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य
मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे
'मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे', रिक्षाचालकांच्या मराठी सक्तीवरून शिंदेंची प्रतिक्रिया
मराठी न बोलल्यास परवाना रद्द करण्याच्या धमक्यांवरचा दुबेंचा इशारा
संजय दुबे यांचा प्रताप सरनाईक यांच्या मराठी भाषेच्या सक्तीला थेट विरोध
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल:
शरद पवार एनडीएमध्ये जाणार नाहीत, विरोधातच राहणार
पवारांकडून एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चा फेटाळल्या; पक्ष कार्यकर्त्यांना दिले स्पष्ट निर्देश
देशमुखांचं कारागृह महानिरीक्षकांना पत्र; गैरप्रकारांच्या चौकशीची मागणी
धनंजय देशमुखांचे बीड कारागृह महानिरीक्षकांना पत्र: गैरप्रकार चौकशी आणि आरोपी स्थलांतराची मागणी
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर? ठाण्यातील कार्यक्रमात भाजप नेत्यांची अनुपस्थिती
बेस्ट कामगारांचा बेमुदत संप; प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
बेस्ट कामगारांचा मंगळवारपासून बेमुदत संप: प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
पालकमंत्री महाजनांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना मदत
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना अवयव प्रत्यारोपणासाठी मदत