राजस्थानातही बलात्कार झाला, मग राहुल गांधी तिकडे का गेले नाहीत?- आठवले

रामदास आठवले यांनी कालच हाथरसमध्ये जाऊन पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती.

राजस्थानातही बलात्कार झाला, मग राहुल गांधी तिकडे का गेले नाहीत?- आठवले

मुंबई: राहुल गांधी हे केवळ भाजपची बदनामी व्हावी, या हेतूनेच हाथरस प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबीयांना भेटायला गेले होते, असा आरोप केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला. राजस्थानमध्येही हाथरसप्रमाणे बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. मग राहुल गांधी त्याठिकाणी भेट देण्यासाठी का गेले नाहीत? ते केवळ भाजपची सत्ता असलेल्या ठिकाणीच प्रशासनाची बदनामी करू पाहत आहेत, अशी टीका आठवले यांनी केली. त्यामुळे आता काँग्रेसकडून या टीकेला कशाप्रकारे प्रत्युत्तर दिले जाणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. (Ramdas Athawale slams Rahul Gandhi)

हाथरस बलात्कार प्रकरणावरून विरोधक सातत्याने भाजपला लक्ष्य करत आहेत. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी नुकतीच बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. सुरुवातीला राहुल आणि प्रियांका गांधी यांना हाथरसला जाण्यासाठी परवानगी नाकारण्यात आली होती. तरीही त्यांनी हाथरसच्या दिशेने कूच केले होते. मात्र, पोलिसांनी या दोघांनाही हाथरसला जाण्यापासून रोखले. यावेळी राहुल आणि प्रियांका गांधी यांना धक्काबुक्कीही झाली होती.

दरम्यान, राहुल गांधी यांनी आज ट्विट करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हाथरस प्रकरणावरुन पुन्हा एकदा लक्ष्य केले. उत्तर प्रदेशातील हाथरस बलात्कार प्रकरणानंतर संपूर्ण व्यवस्था पीडितेच्या कुटुंबावर आक्रमण करते आणि पंतप्रधान एक शब्दही बोलत नाहीत, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.

हाथरस प्रकरणाला वेगळे वळण हाथरस बलात्कार प्रकरणाचे भांडवल करुन जातीय दंगली घडवण्याचे प्रयत्न सुरु असल्याचा दावा योगी सरकारने काही दिवसांपूर्वी केला होता. यानंतर दंगल पसरवण्याच्या आरोपाखाली मेरठमधून चार संशयितांना अटक करण्यात आली होती. या चौघांचाही पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) संघटनेशी संबंध असल्याचे समोर आले आहे. हाथरस प्रकरणाला जातीय रंग देण्यासाठी मॉरिशसमधून तब्बल 50 कोटी रुपयांचा निधी आल्याचा दावाही ‘ईडी’ने केला आहे.

संबंधित बातम्या:

Hathras case: जातीय दंगली पसरवण्यासाठी मॉरिशसमधून 100 कोटींचा निधी, ED चा दावा

रामदास आठवलेंकडून हाथरस पीडित मुलीच्या कुटुंबियांची भेट

(Ramdas Athawale slams Rahul Gandhi)

Published On - 5:43 pm, Wed, 7 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI