मिकाच्या सुटकेसाठी राखी सावंत दुबईला जाणार

मुंबई : ब्राझीलच्या अल्पवयीन मॉडेलला अश्लील फोटो पाठवल्याच्या आरोपावरुन मिका सिंगला दुबई पोलिसांनी अटक केली आहे. बुधवारी रात्री तीनच्या सुमारास त्याला दुबई पोलिसांनी अटक केली. मिकाच्या या कारनाम्यामुळे ड्रामाक्वीन राखी सावंतला इतके वाईट वाटले की ती अक्षरश: रडायला लागली. राखीने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला, यात ती म्हणते आहे, “मिका, तू इतक्या वादात अडकतोस ना, […]

मिकाच्या सुटकेसाठी राखी सावंत दुबईला जाणार
| Updated on: Jul 05, 2019 | 4:52 PM

मुंबई : ब्राझीलच्या अल्पवयीन मॉडेलला अश्लील फोटो पाठवल्याच्या आरोपावरुन मिका सिंगला दुबई पोलिसांनी अटक केली आहे. बुधवारी रात्री तीनच्या सुमारास त्याला दुबई पोलिसांनी अटक केली. मिकाच्या या कारनाम्यामुळे ड्रामाक्वीन राखी सावंतला इतके वाईट वाटले की ती अक्षरश: रडायला लागली.

राखीने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला, यात ती म्हणते आहे, “मिका, तू इतक्या वादात अडकतोस ना, आता मी येते आहे तुला सोडवण्यासाठी. मी दुबईचा व्हिजा शोधत आहे.”

त्यासोबतच तिने आपल्या यूट्यूब चॅनलवरील व्हिडीओत म्हटले की, “तू माझा मित्र आहेस, का माझी इज्जत घालवतो आहेस.”

“तुझा प्रॉब्लेम काय आहे? तू का 17 वर्षांच्या मुलींची छेड काढतो? कधी कुणाला मारतो. का इतके वाद करतो. याचा मला खूप त्रास होतो. का मुलींची छेड काढतो?”

इतकचं नाही तर यानिमित्ताने राखीने मिकासोबतच्या 10 वर्षांपूर्वी झालेल्या किसिंग वादाचीही आठवण करुन दिली. “तुला माहिती आहे ना की ही मुंबई पोलिस नाही तर दुबई पोलिस आहे. 10 वर्षांआधी जेव्हा मी मुंबई पोलिसांकडे तक्रार करायला गेली होती, तेव्हा पोलीस काहीही करु शकले नव्हते. पण तिथल्या पोलिसांचे नियम खूप कडक आहेत.”

आता राखी मिकाला सोडवू शकेल की नाही हे तर सांगता येत नाही. मात्र मुंबई पोलिसांची तुलना दुबई

पोलिसांशी केल्याने ती वादाच्या भोवऱ्यात नक्कीच अडकू शकते.