खलीभाई बदला घे, राखी सावंतची विनवणी

हरियाणा:  हरियाणातील पंचकुला इथं झालेल्या रेसलिंग बिग फाईटदरम्यान, परदेशी महिला पैलवानने उचलून आपटल्याने अभिनेत्री राखी सावंत जखमी झाली. राखीच्या कमरेला दुखापत झाली आहे. राखीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. राखी सावंतने आपल्याला झालेल्या मारहाणीचा बदला भारताचा WWE सुपरस्टार ग्रेट खलीने किंवा महिला पैलवान फोगाट बहिणींना घ्यावा अशी विनंती केली आहे. दुखापतीमुळे राखीला व्हीलचेअरवरुन हॉटेलवर आणलं. […]

खलीभाई बदला घे, राखी सावंतची विनवणी
सचिन पाटील

|

Jul 05, 2019 | 5:02 PM

हरियाणा:  हरियाणातील पंचकुला इथं झालेल्या रेसलिंग बिग फाईटदरम्यान, परदेशी महिला पैलवानने उचलून आपटल्याने अभिनेत्री राखी सावंत जखमी झाली. राखीच्या कमरेला दुखापत झाली आहे. राखीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

राखी सावंतने आपल्याला झालेल्या मारहाणीचा बदला भारताचा WWE सुपरस्टार ग्रेट खलीने किंवा महिला पैलवान फोगाट बहिणींना घ्यावा अशी विनंती केली आहे. दुखापतीमुळे राखीला व्हीलचेअरवरुन हॉटेलवर आणलं. हॉटेलमध्ये आल्यानंतर तिने माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राखी म्हणाली की मला त्या फिरंगी महिला पैलवानाचा बदला घ्यायचा आहे. राखी म्हणाली, “मला स्वत:लाच माहित नाही की काय झालं? मी तर इथे द ग्रेट खलीच्या शो मध्ये सहभागी होण्यासाठी आले होते. पंचकुलामध्ये मी परफॉर्मही केला. मात्र त्या फिरंगीला का भूत लागलं कळलं नाही. तिला माहित नाही की मी कोण आहे.सर्वजण राखी राखी ओरडत होते. त्यामुळे तिला राग आला आणि वेड्यासारखी करु लागली. तिने मला उचलून बराच वेळ हवेत उलटं पकडलं आणि जोरात जमिनीवर आपटलं”

मी काही पैलवान नाही. मात्र मला झालेल्या मारहाणीचा बदला घ्यायला हवा, खलीभाई किंवा भोगट भगिनींनी बदला घ्यावा, असं राखीने म्हटलं आहे.

मला झालेल्या मारहाणीमागे कोणाचं षडयंत्र आहे, हे पाहावं लागेल. बाबा राम महीम किंवा तनुश्री दत्ताचा यामागे हात आहे का अशी शंका राखीने उपस्थित केली.

राखी सावंत पब्लिसिटी स्टंट करतेय अशी भावना लोकांची आहे, असा प्रश्न राखीला विचारण्यात आला. त्यावर राखी म्हणाली, “राखी सावंत जर मेली तरीही लोकांना पब्लिसिटी स्टंटच वाटेल. राखी आणि खलीला पब्लिसिटी स्टंटची गरज काय? असा सवाल राखीने विचारला.

राखीला उचलून आपटलं

एका विदेशी महिला कुस्तीपटूने ओपन चॅलेंज देत भारतीय महिलांना ललकारलं. कुणात दम असेल तर पुढे या, असं आव्हान तिने दिलं. मग राखी सावंत सेटवर आली आणि तिनेही तिला माझ्यासारखं नाचून दाखव असं चँलेंज दिलं. मात्र नाचू लागल्यानंतर विदेशी कुस्तीपटूने तिला उचलून टाकलं आणि त्यात राखी सावंत जखमी झाली. त्यानंतर तिला उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आलं. महिला पैलवान रोबेलने अगोदर राखी सावंतला खांद्यावर घेतलं आणि नंतर जोरात खाली आपटलं.

VIDEO:

संबंधित बातमी 

महिला पैलवानाचं आव्हान स्वीकारणं महागात, राखी सावंत जखमी

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें