केंद्रीय मंत्र्याच्या हेलिकॉप्टर क्रॅशची चर्चा, रविशंकर प्रसाद म्हणतात…

| Updated on: Oct 17, 2020 | 9:46 PM

केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांच्यासह बिहारचे दोन मंत्री असलेल्या हेलिकॉप्टरच्या अपघाताची जोरदार चर्चा सुरु होती.

केंद्रीय मंत्र्याच्या हेलिकॉप्टर क्रॅशची चर्चा, रविशंकर प्रसाद म्हणतात...
Follow us on

नवी दिल्ली : बिहार निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी जोरदार सुरु आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज (17 ऑक्टोबर) केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद (Ravi Shankar Prasad) यांच्यासह बिहारचे दोन मंत्री असलेल्या हेलिकॉप्टरच्या अपघाताची जोरदार चर्चा सुरु होती. मात्र, रविशंकर प्रसाद यांच्या कार्यालयाने या बातमीचं खंडण करत असं काहीही झालं नसल्याचं स्पष्ट केलं (Ravi Shankar Prasad comment on news of helicopter crash).

रविशंकर प्रसाद यांच्या कार्यालयाने ट्विट केलं, “केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरच्या अपगाथाची बातमी खोटी आहे. तसा कोणताही अपघात झालेला नाही आणि ते सुरक्षित आहेत.”

दिवसभरात नेमकी काय चर्चा?

रविशंकर प्रसाद आणि बिहारच्या राज्य सरकारमधील आरोग्य मंत्री मंगल पांडेय आणि जलसंपदा मंत्री संजय झा शनिवारी जमुई येथून निवडणूक प्रचार करुन परतत होते. त्यावेळी त्यांच्या हेलिकॉप्टरचा पाटणा एअरपोर्टवर अपघात झाल्याची चर्चा होती. पार्किंग करताना हेलिकॉप्टरचे पाते पार्किंग शेडला लागून चारही पाते तुटल्याचा दावा करण्यात येत होता.

बिहार निवडणुकीत जमुई मतदारसंघाची स्थिती काय?

जमुई विधानसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यातच मतदान होणार आहे. एनडीएकडून हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला आला आहे. भाजपने येथून श्रेयसी सिंह यांना उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे महाआघाडीत ही जागा आरजेडीच्या (RJD) वाट्याला आली आहे. त्यांच्याकडून या मतदारसंघात विद्यमान आमदार विजय प्रकाश यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

भाजपकडून तिकिट न मिळाल्याने माजी मंत्री नरेंद्र सिंह यांचे पुत्र अजय प्रताप आता आरएलएसपीच्या (RLSP) तिकिटावर निवडणूक मैदानात उतरत आहेत. त्यामुळे या मतदारसंघातील राजकीय चुरस वाढली आहे. श्रेयसी सिंह हे माजी केंद्रीय मंत्री दिवंगत दिग्विजय सिंह आणि माजी खासदार पुतुल यांचे चिरंजीव आहेत. दुसरीकडे विजय प्रकाश माजी केंद्रीय मंत्री जयप्रकाश नारायण यादव यांचे भाऊ आहेत.

हेही वाचा :

आयटी कंपन्यांना 31 जुलैपर्यंत ‘वर्क फ्रॉम होम’ करण्याची सूट, केंद्राची मोठी घोषणा

शिवसेनेवर टीका करताना चूक, संभाजीराजेंचं रवीशंकरांना खरमरीत पत्र, तात्काळ माफीची मागणी

बाळासाहेबांच्या आदर्शाला जे जिवंत ठेऊ शकले नाहीत, त्यांच्याविषयी काही बोलायचे नाही, भाजपची टीका

Ravi Shankar Prasad comment on news of helicopter crash