शिवसेनेवर टीका करताना चूक, संभाजीराजेंचं रवीशंकरांना खरमरीत पत्र, तात्काळ माफीची मागणी

खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांना नाराजीचे खरमरीत पत्र लिहिलं आहे.

Sambhaji Chhatrapati letter to ravi shankar prasad, शिवसेनेवर टीका करताना चूक, संभाजीराजेंचं रवीशंकरांना खरमरीत पत्र, तात्काळ माफीची मागणी

नवी दिल्ली : महाराष्ट्रात सत्तासंघर्ष सुरु असताना आता आरोप-प्रत्यारोपही सुरु झाले आहेत. भाजपने अंधारात पाप केलं असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं. त्याला भाजपकडून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी उत्तर दिलं. शिवाय केंद्रातून कायदेमंत्री रवीशंकर प्रसाद यांनीही पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं. मात्र रवीशंकर प्रसाद यांनी टीकेदरम्यान छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख केल्याचा आरोप करत, छत्रपती संभाजीराजेंनी (Sambhaji Chhatrapati letter to ravi shankar prasad) नाराजी व्यक्त केली आहे.

खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांना नाराजीचे खरमरीत पत्र लिहिलं आहे. रवीशंकर प्रसाद यांनी छत्रपती शिवाजी महाराज असा उल्लेख करायला हवा होता, परंतु शिवाजी शिवाजी असा उल्लेख केल्याने संभाजीराजेंनी पत्रातून नाराजी व्यक्त केली. छत्रपती संभाजीराजे यांनी प्रसाद यांना छत्रपती शिवाजी महाराज असा उल्लेख करण्याचा सल्ला दिला.

Sambhaji Chhatrapati letter to ravi shankar prasad, शिवसेनेवर टीका करताना चूक, संभाजीराजेंचं रवीशंकरांना खरमरीत पत्र, तात्काळ माफीची मागणी

संभाजीराजेंचं पत्र जसंच्या तसं

संभाजीराजे आपल्या पत्रात म्हणतात, “तुम्ही पत्रकार परिषदेत छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख शिवाजी शिवाजी असा केला. त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांच्या भावना दुखावल्या आहेत. तुमच्यासारख्या जबाबदार व्यक्तीला महाराजांचं नाव कसं उच्चारावं हे समजायला हवं. तसंही आजच्या राजकारणात किंवा राजकारण्यांचा छत्रपती शिवाजी महाराज किंवा त्यांच्या विचारांशी संबंध नाही”

तुम्ही एक जबाबदार केंद्रीय मंत्री आहात. तुम्ही जे सांगाल, लोक त्याचंच अनुकरण करतील. छत्रपती शिवरायांचं नाव उच्चारताना आदरयुक्त करावं हीच तुमच्याकडून अपेक्षा आहे. काही दिवसापूर्वी अमिताभ बच्चन यांनीही अशीच चूक केली होती. लोकांनी त्यांना माफी मागण्यास भाग पाडलं. त्यांनी माफी मागून शिवभक्तांच्या भावनांचा आदर ठेवला. माझं तुम्हालाही आवाहन आहे की तात्काळ माफी मागून शिवभक्तांच्या भावनांचा आदर ठेवा” (Sambhaji Chhatrapati letter to ravi shankar prasad)

तुमचाच,

छत्रपती संभाजीराजे

संभाजीराजेंच्या पत्रानंतर रवीशंकर प्रसादांचा माफीनामा

दरम्यान, रवीशंकर प्रसाद यांनी संभाजीराजेंच्या पत्रानंतर तात्काळ ट्विट करुन आपली चूक सुधारण्याचा प्रयत्न केला. छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सर्वांसाठी प्रेरणास्थान आहे. भारतीयांच्या पिढ्या त्यांचा आदर आणि सन्मान नेहमीच ठेवतील, छत्रपती शिवाजी महाराज की जय, असं ट्विट रवीशंकर प्रसाद यांनी केलं.

Chhatrapati Shivaji Maharaj is a true icon and an inspiration for all of us. Generations of Indians will continue to respect and revere him. छत्रपति शिवाजी महाराज की जय।

संबंधित बातम्या  

बाळासाहेबांच्या आदर्शाला जे जिवंत ठेऊ शकले नाहीत, त्यांच्याविषयी काही बोलायचे नाही, भाजपची टीका 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *