…तर नवनाथ बन यांना पुण्यासह महाराष्ट्रात फिरू देणार नाही; रवींद्र धंगेकरांचा यांचा इशारा

रवींद्र धंगेकर आणि नवनाथ बन यांच्यात संघर्ष वाढला आहे. आता धंगेकर यांनी महाराष्ट्रात फिरू देणार नसल्याचा इशारा दिला आहे. धंगेकरांच्या इशाऱ्यानंतर चर्चांना उधाण आलं आहे.

...तर नवनाथ बन यांना पुण्यासह महाराष्ट्रात फिरू देणार नाही; रवींद्र धंगेकरांचा यांचा इशारा
ravindra dhangekar news
| Updated on: Oct 31, 2026 | 9:57 AM

विधानपरिषदेच्या निकालानंतर भाजपचे नवनाथ बन आणि शिंदे गटाचे रवींद्र धंगेकर यांच्यातच जुंपली आहे.  विधानपरिषदेच्या निकालावरून दोन्ही नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी रवींद्र धंगेकर यांना माकडछाप म्हणत निशाणा साधला होता. त्यानंतर रवींद्र धंगेकर यांनी नवनाथ बन यांना पाकीटमार पत्रकार म्हणत प्रत्युत्तर दिलं होतं. त्यानंतर आज शनिवारी सकाळी रवींद्र धंगेकर यांनी नवनाथ बन यांना पुण्यासह महाराष्ट्रात कुठेही फिरणार नाही, असा इशारा दिला आहे.

पुण्यात रवींद्र धंगेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी रवींद्र धंगेकर यांनी पुण्यातील पाण्याच्या समस्यांवर भाष्य केलं. ‘पुण्याच्या पाण्याच्या नियोजनासाठी नदीजोड प्रकल्पातून कोकणातून पाणी उपलब्ध करावे लागणार तरच पुण्याची पाण्याची समस्या कायमस्वरूपी संपेल. सरकारने यावर लवकरात लवकर नियोजन करावे. तसेच राणा सूर्यवंशी संदर्भात आज मी पत्रकार परिषद घेणार असून कागदपत्रांसहित माहिती समोर मांडणार असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर नवनाथ बन याचा समाचार घेतला.

Loading...

‘नवनाथ बन हे पत्रकार आहेत. कोणाचेही फोटो काढतात आणि बसतात. तसेच फोटो काढून दाखवतात. माझ्या लेव्हलला आलो, तर मी नवनाथ बन यांना पुणेसह महाराष्ट्रात फिरू देणार नाही. नवनाथ बन हा पगारापेक्षा जास्त बोलतोय. नवनाथ बन हा पगारी आहे, त्याला दाखवावे लागते की, कुणासाठी काहीतरी करतोय. तो तुकड्यावर जगत आहे. आम्ही कुणाच्या तुकड्यावर जगत नाही. भाजपमधील लोकांना माहितीये की, झारीतले शुक्राचार्य कोण आहेत. नेतृत्वासंदर्भात त्यांच्या पक्षात देखील असंतोष आहे, असे धंगेकर म्हणाले.

‘लोकांची मांडीवर घेतलेली पोरं सांभाळत आहेत. त्याच्यावर राजकारण करीत आहेत. 14 पक्षासोबत यांची युती आणि माझ्यावर 12 पक्षातून आलेले टीका करीत आहेत. बनपेक्षा भाजपमध्ये लायकीचे लोक नाहीत का? तरी त्याला नगरसेवक केले आहे, असे धंगेकर म्हणाले. त्यानंतर सदावर्ते यांच्यावर टीका करताना धंगेकर म्हणाले, गुणवत्त सदावर्ते हा मोठा माणूस आहे. पण हा कोणाच्या जवळ असतो, कोणाच्या पालख्या वाहतो हे सर्वांना माहिती आहे. त्यांचं मनावर घेण्यासारखं वक्तव्य नाही’.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us