एकदा चार्ज करा, 156 किमी चालवा, Revolt ची ई-बाईक, EMI फक्त…

| Updated on: Aug 28, 2019 | 9:53 PM

दुचाकी कंपनी Revolt ने भारतात दोन इलेक्ट्रिक बाईक (e-Bike) Revolt RV 400 आणि Revolt RV 300 लाँच केल्या आहेत. कंपनीने या बाईक एका अनोख्या पेमेंट प्लॅनसोबत लाँच केल्या. या प्लॅननुसार तुम्ही फक्त 2,999 रुपयांमध्ये या बाईक घरी आणू शकता.

एकदा चार्ज करा, 156 किमी चालवा, Revolt ची ई-बाईक, EMI फक्त...
Follow us on

मुंबई : दुचाकी कंपनी Revolt ने भारतात दोन इलेक्ट्रिक बाईक (e-Bike) Revolt RV 400 आणि Revolt RV 300 लाँच केल्या आहेत. कंपनीने या बाईक एका अनोख्या पेमेंट प्लॅनसोबत लाँच केल्या. या प्लॅननुसार तुम्ही फक्त 2,999 रुपयांमध्ये या बाईक घरी आणू शकता. Revolt RV 300 या बाईकसाठी तुम्हाला महिन्याला फक्त 2,999 रुपये द्यावे लागतील (Revolt E-Bike Easy EMI). तर RV 400 साठी 3,499 रुपये आणि टॉप मॉडेलसाठी दर महिन्याला 3,999 रुपये द्यावे लागेल.

हे पैसे तुम्हाला 37 महिन्यांपर्यंत भरावे लागतील. विशेष म्हणजे यासाठी कुठल्याही प्रकारचा डाऊन पेमेंट द्यावा लागणार नाही. तसेच, गाडी घेतल्याच्या पहिल्या दिवसापासूनच ग्राहक या गाडीचा मालक असेल.

Revolt RV300

Revolt RV300 इलेक्ट्रिक बाईकमध्ये 1.5 kw ची मोटार आणि 2.7 kw ची बॅटरी देण्यात आली आहे. याची टॉप स्पीड 65 किलोमीटर आहे. फुल्ल चार्ज झाल्यावर Revolt RV300 इक्ट्रिक बाईक 80 ते 150 किलोमीटरपर्यंत धावू शकते.

Revolt RV400

Revolt RV400 ई-ईकमध्ये 3kW ची मोटार आणि 3.24kW लिथीअम आयन-बॅटरी देण्यात आली आहे. एकदा फुल्ल चार्ज झाल्यावर ही गाडी 156 किलोमीटरपर्यंत धावेल. याची टॉप स्पीड 85 किलोमीटर प्रती तास आहे. Revolt RV400 ला गाडीसोबत मिळणाऱ्या चार्जिंग केबलच्या मदतीने कुठल्याही रेग्युलर 15 ऐम्पीअर प्लग पॉईंटवर चार्ज करता येतं. म्हणजे तुम्ही ही बाईक घरीही चार्ज करु शकता.

स्मार्ट ई-बाईक

Revolt च्या या ई-बाईक्स स्मार्ट मोटारसायकल आहेत. यामध्ये Revolt मोबाईल अॅपची सुविधाही देण्यात आली आहे. या अॅपच्या मदतीने तुम्ही तुमची बाईक ट्रक करु शकता. ट्रीप हिस्ट्री चेक करु शकता.

Revolt RV400 ची डिलीव्हरी सप्टेंबरला नवी दिल्ली येथे सुरु होईल. पुढील महिन्यात कंपनी ही गाडी पुण्यात लाँच करेल. त्यानंतर पुढील चार महिन्यांमध्ये ही गाडी बंगळुरु, हैद्राबाद, नागपूर, अहमदाबाद आणि चेन्नईमध्ये लाँच केली जाईल.

संबंधित बातम्या :

Harley Davidson ची भारतातली पहिली ई-बाईक, किंमत तब्बल…

Hero Electric Dash ई-स्कूटर लाँच, फुल्ल चार्जिंगवर 60 किमी धावणार

लवकरच मारुती सुझुकीची छोटी SUV भेटीला, किंमत फक्त…

Hero Electric च्या दोन नव्या ई-स्कूटर लाँच, किंमत आणि फिचर