Hero Electric Dash ई-स्कूटर लाँच, फुल्ल चार्जिंगवर 60 किमी धावणार

Hero Electric ने एक नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली आहे. Hero Electric Dash या नावाने ही ई-स्कूटर लाँच करण्यात आली. या स्कूटरची किंमत 62 हजार रुपये आहे. फुल्ल चार्ज केल्यानंतर ही स्कूटर 60 किलोमीटरपर्यंत चालेल असा दावा कंपनीने केला आहे.

Hero Electric Dash ई-स्कूटर लाँच, फुल्ल चार्जिंगवर 60 किमी धावणार

मुंबई : Hero Electric ने एक नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली आहे. Hero Electric Dash या नावाने ही ई-स्कूटर लाँच करण्यात आली. या स्कूटरची किंमत 62 हजार रुपये आहे. फुल्ल चार्ज केल्यानंतर ही स्कूटर 60 किलोमीटरपर्यंत चालेल, असा दावा कंपनीने केला आहे. हीरो इलेक्ट्रिकचे स्कूटर हे कमर्शिअल यूजला लक्षात ठेऊन बनवले जातात, असंही कंपनीने सांगितलं.

Hero Electric Dash मध्ये 28Ah लिथियम-आयन बॅटरी देण्यात आली आहे. याला फुल्ल चार्ज करण्यासाठी चार तासांचा वेळ लागतो. या स्कूटरमध्ये एलईडी डीआरएल, एलईडी हेडलाईट्स, डिजीटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, यूएसबी चार्जिंग पोर्ट, ट्यूबलेस टायर आणि सीट खाली देण्यात आलेल्या डिक्कीसाठी रिमोट एक्सेस यांसारख्या सुविधा देण्यात आल्या आहेत.

देशभरात सध्या हीरो इलेक्ट्रिकचे 615 टचपॉईंट आहेत. तर 2020 पर्यंत 1 हजार टचपॉईंट करण्याची योजना कंपनीची आहे. शिवाय पुढील तीन वर्षात दरवर्षी 5 लाख यूनिट प्रॉडक्शनचं कंपनीचं लक्ष्य आहे.

गेल्या आठवड्यात हीरो इलेक्ट्रिकने Optima ER आणि Nyx ER इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केले होते. यामध्ये Optima ER ची किंमत 68,721 रुपये आणि Nyx ER ची किंमत 69,754 रुपये आहे. फुल्ल चार्ज झाल्यानंतर Optima ER ही 110 किलोमीटर आणि Nyx ER ईआर 100 किलोमीटर पर्यंत चालेल असा दावा कंपनीने केला. या दोन्ही ई-स्कूटर्सची टॉप स्पीड 42 किलोमीटर प्रती तास आहे.

संबंधित बातम्या :

लवकरच मारुती सुझुकीची छोटी SUV भेटीला, किंमत फक्त…

ह्युंडाईची नवीन कार लाँच, पाहा किंमत आणि फीचर्स

Hero Electric च्या दोन नव्या ई-स्कूटर लाँच, किंमत आणि फिचर

रॉयल एन्फिल्डच्या ग्राहकांना कंपनीकडून खुशखबर

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *