‘गोमूत्र हा कोरोनावरील रामबाण उपाय’, हिंदू महासभेच्या दाव्यावर रिचा चढ्ढा म्हणते…

अखिल भारतीय हिंदू महासभेनं गोमूत्र हा कोरोनावरील रामबाण उपाय असल्याचा दावा केला आहे (Richa Chadda on gomutra party). यासाठी हिंदू महासभेनं गोमूत्र पिण्याच्या विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं.

गोमूत्र हा कोरोनावरील रामबाण उपाय, हिंदू महासभेच्या दाव्यावर रिचा चढ्ढा म्हणते...
| Updated on: Mar 15, 2020 | 2:44 PM

नवी दिल्ली : अखिल भारतीय हिंदू महासभेनं गोमूत्र हा कोरोनावरील रामबाण उपाय असल्याचा दावा केला आहे (Richa Chadda on gomutra party). यासाठी हिंदू महासभेनं गोमूत्र पिण्याच्या विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाचं पोस्टर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं. हे पोस्टर बघितल्यानंतर ‘गोमूत्र कोण पितं हे मला बघायचं आहे’, असं बॉलिवूड अभिनेत्री रिचा चढ्ढा म्हणाली होती. मात्र, हिंदू महासभेच्या कार्यक्रमात लोकांनी खरंच गोमूत्र पिल्याचं एका व्हिडीओत समोर आलं आहे. हा व्हिडीओ पाहून रिचाला आश्चर्याचा धक्का बसला (Richa Chadda on gomutra party).

कोरोनावर अजूनही ठोस असा तोडगा निघालेला नाही. जगभरातील वैज्ञानिक आणि डॉक्टर्स यावर संशोधन करत आहेत. मात्र, अजूनही यावर कोणतीही लस किंवा औषध निर्माण झालेलं नाही. याशिवाय हा आजार प्रचंड वेगाने पसरत आहे. त्यामुळे या आजाराबात सर्वसामान्यांच्या मनात भीती आहे. मात्र, गोमूत्र हा कोरोनावरील रामबाण उपाय असल्याचा दावा अखिल भारतीय हिंदू महासभेने केला आहे.

यावर अभिनेत्री रिचा चढ्ढाने टीका केली होती. “गोमूत्र कोण पितं हे मला बघायचं आहे”, असं बॉलिवूड अभिनेत्री रिचा चढ्ढा म्हणाली होती. रिचा चढ्ढाच्या या ट्विटनंतर एका व्यक्तीने ट्विटरवर व्हिडीओ शेअर केला आणि त्यासोबत रिचाला टॅग केलं. त्या व्हिडीओत गोमूत्र लोकांमध्ये वाटलं जात होतं आणि लोक ते गोमूत्र पित होते, असं दिसत होतं. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर रिचा चड्डा आश्चर्यचकीत झाली. हा व्हिडीओ शेअर करताना “नाही, नाही, असं होऊच शकत नाही”, असं रिचा म्हणाली.

कोरोनाने जगभरात धुमाकूळ घातला आहे. या आजारामुळे आतापर्यंत जगभरात 5000 पेक्षाही जास्त लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. हा कोरोना भारतातही पोहोचला आहे. भारतात आतापर्यंत 105 जण कोरोना बाधित झाल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना बाधित रुग्णांची संख्या असल्याची माहिती समोर आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सर्व शाळा-कॉलेजांना 31 मार्चपर्यंत सुट्टी देण्यात आली आहे.

संबंधित बातम्या :

Corona | महाराष्ट्रात कोरोनाचे आणखी पाच रुग्ण, देशातील आकडा 100 च्या पार, पाक सीमा सील

CoronaVirus : रुग्णांचा कोरोनाशी यशस्वी लढा, भारतात उपचारानंतर 11 जण ठणठणीत बरे

इटलीत हनिमून, पतीला कोरोनाची लागण झाल्याचं समजताच पत्नीचा पोबारा

Corona virus | चीन, इराणसह 7 देशांचा प्रवास करुन आलेल्यांसाठी पुणे विभागीय आयुक्तांच्या सूचना

CORONA : वधू-वरात तीन फूट अंतर, एकही नातेवाईक नको, पुण्यात सामूहिक विवाहासाठी ‘कोरोना’ अटी

Corona | मोदी सरकारचा मोठा निर्णय, कोरोनामुळे मृत्यू झाल्यास नातेवाईकांना 4 लाखांची मदत