हिंदू-मुस्लिम एकतेवर रितेश देशमुखचा टिक टॉक व्हिडीओ

बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह (Ritesh Deshmukh tik tok video) असतो.

हिंदू-मुस्लिम एकतेवर रितेश देशमुखचा टिक टॉक व्हिडीओ
| Edited By: | Updated on: Mar 05, 2020 | 8:29 AM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह (Riteish Deshmukh tik tok video) असतो. सोशल मीडियावर तो नेहमी आपली वैयक्तिक अपडेटत देत असतो. त्यासोबत अनेक मजेदार असे व्हिडीओ शेअर करत असतो. नुकतेच त्याने एक अशी पोस्ट केली आहे ज्यामधून रितेशने धर्मनिरपेक्ष (Riteish Deshmukh tik tok video) याचा संदेश दिला आहे.

गेल्या महिन्यात दिल्लीमध्ये झालेल्या हिंसेवर अनेक कलाकारांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या होत्या. त्यासोबत अनेक बॉलिवूड कलाकारांनीही शांत राहण्याचा सल्ला दिल्लीकरांना दिला होता.

रितेशने ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. टिकटॉकवर रिलीज केलेल्या या सॉन्गच्या लिरिक्समध्ये हिंदू-मुस्लीम एकतेबद्दल सांगितले आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये रितेशने म्हटले, हिंदू मुस्लिम भाई भाई.

हे गाणे 2015 मध्ये रिलीज झाले होते. बँगिस्तानच चित्रपटातील हे गाणे आहे. या चित्रपटात अभिनेता पुलकीत आणि रितेश होता. या गाण्याचे नाव मौला आहे आणि ऋतुराज मोहंती-राम सपंत या दोघांनी हे गाणे गायले होते.

दरम्यान, रीतेश बागी 3 चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात अभिनेता टायगर श्रॉफ, अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि अंकिता लोखंडेसारखे कलाकार दिसणार आहेत. चित्रपटात रितेश हा टायगरचा भाऊ आहे.