Viral Post: घरमालकाला निम्मा पगार अन् उरलेल्यातून संसार… मुंबईकरांच्या जगण्याचं भयाण वास्तव!

मुंबईमध्ये गगनाला भिडणारे घरांचे भाडे चांगल्या चांगल्या पगारदारांचे बजेट बिघडवून टाकते. सध्या सोशल मीडियावर एट द मुव्हमेंट चे क्रिएटिव्ह हेड अंश जैन ने लिंकडीनवर एक पोस्ट करत मुंबईत राहण्याचं असं दुःख मांडल जे मुंबईतला बहुतांश नोकरदार वर्ग भोगत आहे. 

Viral Post: घरमालकाला निम्मा पगार अन् उरलेल्यातून संसार... मुंबईकरांच्या जगण्याचं भयाण वास्तव!
Mumbai News
| Updated on: Nov 23, 2026 | 2:41 PM

Mumbai Life Viral Post:  मुंबई म्हणजे स्वप्नांचं शहर असं म्हटले जाते. हे शहर प्रत्येकालाच आकर्षित करतं. इथली लाईफस्टाईल अन् या शहराची श्रीमंती सर्वांनाच भुरळ घालते. मात्र इथं राहणाऱ्या नोकरदार वर्गाच्या व्यथा वेगळ्याच आहेत. मुंबईमध्ये गगनाला भिडणारे घरांचे भाडे चांगल्या चांगल्या पगारदारांचे बजेट बिघडवून टाकते. सध्या सोशल मीडियावर एट द मुव्हमेंट चे क्रिएटिव्ह हेड अंश जैन ने लिंकडीनवर एक पोस्ट करत मुंबईत राहण्याचं असं दुःख मांडल जे मुंबईतला बहुतांश नोकरदार वर्ग भोगत आहे.

काय आहे पोस्ट? 

Loading...

आपल्या पोस्टमध्ये अंशने म्हणतो की, मुंबईत भाडे न देणाऱ्या आपल्या सहकाऱ्यांचा त्याला हेवा वाटतो. अलीकडेच त्याने एका माजी सहकाऱ्याची सोशल मीडियावर एक स्टोरी पाहिली. ती दर सहा महिन्यांनी आग्नेय आशियाई देशात सुट्टीसाठी जाते. तिचे फोटो पाहून अंश उत्स्फूर्तपणे म्हणाला, “अरे व्वा, तिच्याकडे किती पैसे आहेत!” मग त्याच्या पत्नीने विचारले, “ती भाडे देते का?” उत्तर होते “नाही.” हसत अंशने लिहिले, “ठीक आहे, हे चांगलं आहे. मी फक्त प्रार्थना करतो की आपल्याला कधीही भाडे द्यावे लागू नये.”

भाडे न देणााऱ्या सहकाऱ्यांचा वाटतो हेवा..! 

तो म्हणतो की, ज्यांच्यावर भाड्याचे ओझे नसते, त्यांच्याकडे आपले छंद जोपासण्यासाठी अधिक पैसे शिल्लक राहतात. समान पगार असूनही, जे त्यांच्या स्वतःच्या घरी राहतात त्यांची जीवनशैली अशी असते की जणू ते दुप्पट कमावतात. हे सर्व घडते कारण ते त्यांच्या पालकांनी विकत घेतलेल्या घरात राहतात. आपला अनुभव सांगताना अंशने स्पष्ट केले की, ८,००० रुपयांचे शूज खरेदी करण्यापूर्वी त्याला दोनदा विचार करावा लागतो. ज्यांना भाडे द्यावे लागत नाही, ते बचत करूनही विचार न करता महागड्या वस्तू खरेदी करतात.

तो असेही म्हणाला की, एकटे राहणारे लोक केवळ भाड्यामुळेच नाही, तर मोलकरीण, किराणा, वीज, वाय-फाय आणि घराची दुरुस्ती यांसारख्या खर्चांमुळेही मासिक बजेटवर ताण येतो. घर सांभाळण्याचा मानसिक ताणही काही कमी नसतो. काय जेवण करायचे याचे नियोजन करणे, कपडे धुणे आणि खर्चाचा हिशोब ठेवणे ही सर्व डोकेदुखीची कामे आहेत. मात्र, अंशने आपली परिस्थिती मान्य केली आणि सांगितले की ही त्याची निवड होती. तो आपल्या गावी परत जाऊन या सर्व सुविधांचा आनंद घेऊ शकला असता, पण त्याने मुंबईत काम करणे निवडले.

नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया! 

दरम्यान, या पोस्टवर नेटकऱ्यांनीही संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. लहान शहरांतील लोकांसाठी आयुष्य कधीच सोपे नसते, पण हे संघर्ष आपल्याला अधिक मजबूत बनवतात., त्याचप्रमाणे पगारदार लोकांनी व्यावसायिकांचा मत्सर करायला हवा, जे जास्त कमावतात पण कमी कर भरतात. आणखी एकाने याची तुलना न्यूयॉर्कमधील जास्त भाड्याशी केली आणि सुचवले की आजकाल पुढच्या पिढीसाठी मेट्रो शहरात १ बीएचके फ्लॅट खरेदी करणे ही सर्वोत्तम भेट आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us